मुंबई (वार्ताहर) : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल (Savarkar) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. मात्र यात्रेदरम्यान राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा अकोल्यात बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. या वादात आता मनसेने उडी घेतली आहे.
राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातील मनसैनिकांनी शेगावला जावे, असे थेट आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आता मनसेचे कार्यकर्ते शेगावला जाणार आहेत.






