Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

Ivana Trump : इव्हाना ट्रम्प यांच्या बंगल्याची होणार विक्री

Ivana Trump : इव्हाना ट्रम्प यांच्या बंगल्याची होणार विक्री

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घटस्फोटित पत्नी इव्हाना ट्रम्प (Ivana Trump) यांचा मॅनहॅटनमध्ये बांधलेल्या आलिशान बंगल्याची विक्री होणार आहे.

हा बंगला ८,७२५ चौरस फुटांचा असून ब्रोकिंग फर्मने या बंगल्याची किंमत जवळपास २१५ कोटी रुपये ठेवली आहे. विक्रीतून मिळालेली रक्कम इव्हाना आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तीन मुले, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, एरिक ट्रम्प आणि इव्हांका ट्रम्प यांच्यात विभागली जाईल.

६४व्या रस्त्यावरील या ५ बेडरुमच्या, ५ बाथरुमच्या बंगल्यात १९८०च्या दशकातील इंटिरियर आहे. इवानाने हा बंगला १९९२ मध्ये केवळ २० कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्याच वर्षी त्यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून घटस्फोट झाला होता.

इव्हाना आणि ट्रम्प हे १५ वर्षे एकमेकांसोबत राहिले. १९९२मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. इव्हाना अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळे मीडियाच्या चर्चेत राहिली होती. जुलै २०२२ मध्ये इव्हाना ट्रम्प त्यांच्या बंगल्यात मृतावस्थेत आढळून आल्या. इव्हाना यांचा मृत्यू अपघाती होता. मॅनहॅटन अपार्टमेंटच्या पायऱ्यांवरून खाली पडल्याने इव्हाना यांना गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment