Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीNASA Moon Mission : नासाचे मून मिशन ‘आर्टेमिस-१’ यशस्वीपणे लाँच

NASA Moon Mission : नासाचे मून मिशन ‘आर्टेमिस-१’ यशस्वीपणे लाँच

फ्लोरिडा : नासाने मून मिशन ‘आर्टेमिस-१’ यशस्वीपणे लाँच केले आहे. (NASA Moon Mission ‘Artemis-1‘ successfully launched) हे प्रक्षेपण आज फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून करण्यात आले. नासाचा हा तिसरा प्रयत्न आहे. ‘आर्टेमिस-१’ ही मोहीम नासाच्या मंगळ मोहीमेनंतरची सर्वात महत्वाची मोहीम आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी १२.१७ वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून रॉकेटने उड्डाण घेतले. यापूर्वी २९ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबरलाही प्रक्षेपण करण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानामुळे ते पुढे ढकलावे लागले होते.

नासाने या मिशनच्या माध्यमातून ओरिअन अंतराळयान चंद्रावर पाठवले आहे. हे यान ४२ दिवसात चंद्रावर प्रवास करून परत येईल. अमेरिकेच्या ५० वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

आत्तापर्यंतचे सर्वात शक्तिशाली इंजिन

जर हे मिशन यशस्वी झाले तर. २०२५ पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवले जातील. ‘आर्टेमिस-१’ रॉकेट ‘हेवी लिफ्ट’ आहे आणि त्यात आत्तापर्यंतची सर्वात शक्तिशाली इंजिने आहेत. हे रॉकेट चंद्राच्या कक्षेत जाईल आणि काही छोटे सॅटेलाईट सोडेल आणि नंतर स्वत:च्या कक्षेत स्थापित होईल.

या प्रकल्पासाठी ९३ बिलियन डॉलर (७४३४ अब्ज रुपये) खर्च

नासाच्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी ९३ बिलियन डॉलर (७४३४ अब्ज रुपये) खर्च येईल. त्याचवेळी प्रत्येक फ्लाईटची किंमत ४. १ अब्ज डॉलर्स म्हणजे ३२७ अब्ज रुपये असेल. या प्रकल्पावर आतापर्यंत ३७ बिलियन डॉलर्स म्हणजेच २,९४९ अब्ज रुपये खर्च झाले आहेत.

नासा चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत

अमेरिका ५३ वर्षांनंतर पुन्हा एकदा आर्टेमिस मिशनद्वारे चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहे. त्याचे तीन भाग केले आहेत. आर्टेमिस-1, 2 आणि 3. आर्टेमिस-1 चे रॉकेट चंद्राच्या कक्षेत जाईल, काही छोटे उपग्रह सोडेल आणि नंतर स्वतःच कक्षेत स्थापित होईल.

2024 च्या आसपास आर्टेमिस-2 लाँच करण्याची योजना आहे. यात काही अंतराळवीरही जातील, पण ते चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत. चंद्राच्या कक्षेत फिरल्यानंतरच ते परत येतील. या मोहिमेचा कालावधी अधिक असेल.

यानंतर, अंतिम मिशन आर्टेमिस-3 रवाना केले जाईल. यामध्ये जाणारे अंतराळवीर चंद्रावर उतरतील. हे मिशन 2025 किंवा 2026 मध्ये लॉंच केले जाऊ शकते. पहिल्यांदाच महिलाही ह्युमन मून मिशनचा भाग असणार आहेत. यामध्ये पर्सन ऑफ कलर (पांढऱ्यापेक्षा वेगळ्या वंशाची व्यक्ती) देखील क्रू मेंबर असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले पाणी आणि बर्फ यावर अंतराळवीर संशोधन करणार आहेत.

संबंधित बातम्या…

‘नासा’ला अखेर चंद्रावर पाणी सापडले!

‘नासा’च्या चांद्रवीर मोहिमेत भारतीय वंशाचे राजा जॉन

मंगळावर ऑक्सिजन; नासाला मोठे यश

मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्यात नासाला यश!

नासाने जाहीर केली ‘सेल्फीं’ची छायाचित्रे

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -