लखनऊ (वृत्तसंस्था) : नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने (candidate) मतदारांना एक ट्रक कोंबडे वाटल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शामलीत हा प्रकार घडला आहे. कोंबडे घेण्यासाठी लोकांची लांबलचक रांग लागली होती.
या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. याद्वारे मतदारांना लाच दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मंगळवारी खामला भागातील अध्यक्षपदाचे उमेदवार व माजी अध्यक्ष हाजी इस्लाम यांनी मतदारांना मोफत कोंबडे वाटले. हाजी इस्लाम यांनी एक ट्रकभर कोंबडे मागवले होते. ते त्यांनी रांग लावून वाटले.
माजी अध्यक्ष हाजी इस्लाम म्हणाले की, “हे सर्व जनतेचे कर्ज होते. ते फेडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण फेडता येणार नाही. निवडणूक केव्हा होईल? हे कुणालाही माहिती नाही. मी केवळ लोकांचे कर्ज फेडण्यासाठी कोंबडे वाटत आहे. मी बोलावल्यानंतर एवढी मोठी गर्दी झाली हे माझ्यावरील प्रेमाचे द्योतक आहे.”
रांगेत लागलेले हारुन म्हणाले, “अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर असल्यामुळे हाजी कोबंडे वाटत आहेत. संपूर्ण शहरात चिकन वाटले जात आहेत. हाजींनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात चांगले काम केले. त्यामुळे ते निश्चितच निवडून येतील. आज घरोघरी कोंबडे वाटले जात आहेत. ते सर्वांना मिळेल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…