भाईंदर : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये भारतीय नौदल सेना यांचे मार्फतीने सागरी सुरक्षा अभियान (SEA-VIGIL-22) राबविण्यात येत आहे.
सदर अभियानामध्ये फिशरीज, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (एम .एम. बी), कस्टम, कोस्टगार्ड इत्यादी विभागांशी समन्वय राखून सागरी सुरक्षा अनुषंगाने अभियान राबविण्यात येत आहे.
समुद्र मार्गाने होणाऱ्या संशयित हालचाली तसेच समुद्रकिनारी भागातील परिसरामध्ये वावरणारे संशयित व्यक्ती या बाबींची तपासणी करण्याकरिता पोलिसांच्या वतीने मोठ्या प्रमाणात चेकिंग राबविण्यात येत आहे. त्यामध्ये आयुक्तालयातील एकूण १६० पोलीस अधिकारी, ४९० पोलिस अंमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बल व होमगार्डचे १७० जवान त्याचप्रमाणे सागरी बोट, चारचाकी वाहने व मोटार सायकलव्दारे चेकिंग व नाकाबंदी करण्यात येत आहे.
मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दित मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करत सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून शहरात सर्वत्र समुद्र किनारी पोलीस बंदोबस्त लावत व मुख्य रसत्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. समुद्राच्या मार्गे दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने शहरात प्रवेश करू नये याकरता सागरी कवच अभियान राबवण्यात येते.
मंगळवार सकाळ पासून ते बुधवारी रात्री पर्यंत सागरी सुरक्षा कवच अभियान सुरु असणार आहे. या दरम्यान आयुक्तलयाच्या हद्दित नाकाबंदी करत असणारे पोलीस त्यांचे कर्तव्य योग्य रित्या पार पाडतात का याची देखील वरिष्ठाच्या मार्फ़त तपासणी केली जाते. अभियाना दरम्यान गस्त घालणारे पोलीस खरच जागरूक आहेत का हे बघण्यासाठी खोटे दहशतवादी, चोर बनवून नाकाबंदी असणाऱ्या ठिकाण हुन वाहनांमधून, बोटीतून पाठवले जातात.
World population : जगाची लोकसंख्या ८०० कोटींवर!
सागरी सुरक्षा अभियान अंतर्गत पोलीस नाकाबंदी दरम्यान संशय वाटणाऱ्या सर्व वाहनांची थांबवुन तपासणी करत त्यांची शहानिशा केल्यानंतरच त्यांना सोडण्यात येते. मीरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये उत्तन सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेलंकनी, गोराई व वसई विरार मध्ये देखील समुद्र किनारा पट्टी आहे. यामुळे समुद्राच्या मार्गे शहरात सहजरीत्या प्रवेश करण्यास दहशतवाद्यांना सोपे असल्याने या ठिकाणी नेहमीच पोलीस गस्त घालून बसलेले असतात. अभियानांतर्गत समुद्राच्या मार्गे एखादा दहशतवादी येताना दिसला तर कशाप्रकारे त्याला रोखावे याची देखील माहिती दिली जाते. त्याचबरोबर समुद्रात मासेमारी करता बोट घेऊन जाणाऱ्यां मच्छीमारांना देखील एखादी अनोळखी बोट समुद्रात संशयास्पद दिसल्यास पोलीसांना कळवावे व दक्षता घ्यावी याची जनजागृती केली जाते.अभियाना अंतर्गत पोलीस स्वता बोटी मधून समुद्रात जात गस्त घालतात.
मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तलयात “सि व्हिजील”२०२२ सुरक्षा अभियान करता मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. या मध्ये भाईंदर, मीरा रोड, नवघर, नयानगर, काशिमीरा, उत्तन, वसई,विरार,आचोले,नालासोपारा, वालीव, अर्नाळा अश्या एकूण १६ पोलीस स्टेशन चा समावेश असून यात १५४ पोलीस अधिकारी, ४७६ पोलीस अमलदार, १५ महिला अमलदार, ५५ होमगार्ड, मसूबचे ११४ जन अश्या प्रकारे मनुष्यबळ सुरक्षतेच्या दृष्टीने लावण्यात आला आहे. याच बरोबर उत्तन सागरी पोलीस ठाण्या अंतर्गत शपथ पोलीस स्पिड बोट,वंदेमातरम व ग्लोरियस खाजगीबोट यांच्या साह्याने उत्तम चॅनेल परिसर, वाशीबेट, उत्तन चौक या मार्गे अधिकारी, अंमलदार, शस्त्र, दारुगोळा, तांत्रिक मनुष्यबळ यांच्या मदतीने गस्त घालण्यात येत आहे.