Friday, April 18, 2025
HomeदेशDhyanChand Award : अचंत शरथ कमलला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जाहीर

DhyanChand Award : अचंत शरथ कमलला मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०२२ सालचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नुकतेच जाहीर केले आहेत. विविध कॅटेगरीतील पुरस्कारांची घोषणा केली. टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमलला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार (Dhyanchand Award) जाहीर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जाहीर केलेल्या यादीत (Dhyanchand Award) एकाही क्रिकेटपटूचे नाव नाही. पण, रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांची द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते ३० नोव्हेंबरला पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत अर्जुन पुरस्कारासाठी २५ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या यादीत बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन, एल्डोस पॉल, अविनाश साबळे, बॉक्सर निखत जरीन यांसारख्या स्टार्स खेळाडूंच्या नावांचाही समावेश आहे. यासोबतच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सात प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनाही द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करतील.

सीमा पुनिया (अॅथलेटिक्स), एल्डोस पॉल (अॅथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबळे (अॅथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निकहत जरीन (बॉक्सिंग), भक्ती प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (ज्युदो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मल्लखांब), इलावेनिल वलारिवन (शूटिंग), ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकूर (वेट लिफ्टिंग), अंशू (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशू), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्निल संजय पाटील (पॅरा स्विमिंग), जेरलिन अनिका जे (डेफ बॅडमिंटन) या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. जीवनजोत सिंह तेजा (नेमबाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा सिद्धार्थ शिरूर (पॅरा शूटिंग), सुजीत मान (कुस्ती) या खेळाडूंना द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी प्रशिक्षकांसाठी) जाहीर झाला आहे.

दिनेश जवाहर लाड (क्रिकेट), बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल), राज सिंह (कुस्ती) यांना द्रोणाचार्य पुरस्कार (लाईफटाईम कॅटेगरी) यांना जाहीर झाला आहे. अश्विनी अकुंजी सी (अॅथलेटिक्स), धर्मवीर सिंह (हॉकी), बीसी सुरेश (कबड्डी), नीर बहादुर गुरुंग (पॅरा अॅथलेटिक्स) यांना लाईफटाईम कॅटेगरीत अचीव्हमेंटसाठी ध्यानचंद पुरस्कार जाहीर केला आहे. ट्रांस स्टेडिया इंटरप्रायजेस प्रायवेट लिमिटेड, कलिंगा सूचना प्रौद्योगिकी संस्थान, लद्दाख स्की आणि स्नोबोर्ड संघ राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार २०२२ जाहीर केले आहेत. अमृतसरमधील गुरू नानक देव विश्वविद्यालयाला मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी जाहीर केली आहे.

महत्वाची बातमी…

Kabaddi : महाराष्ट्र कबड्डी संघाचे नेतृत्व कोल्हापूरच्या दादासो पुजारीकडे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -