Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीArun Gawli : अरुण गवळीला चार दिवसांचा पॅरोल मंजूर

Arun Gawli : अरुण गवळीला चार दिवसांचा पॅरोल मंजूर

मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळी (Arun Gawli) याला मुलाच्या लग्नासाठी चार दिवसांचा सुरक्षेविना पॅरोल मंजूर केला आहे. (Arun Gawli granted parole for four days) अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात कैद आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला संचित रजा देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कमी कालावधीचा पॅरोल मंजूर केला आहे.

अरुण गवळीच्या (Arun Gawli) मुलाचे १७ नोव्हेंबरला लग्न आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करण्यात आला होता. यावर अरुण गवळीने पोलिसांच्या सुरक्षा कड्यामध्ये जावे, हा खर्च गवळी यानेच करावा, अशी मागणी पोलिसांनी केली होती. यावर कोर्टाने गवळीला पॅरोल मंजूर करताना पोलिसांच्या सुरक्षेशिवाय जाण्याची परवानगी दिली आहे.

मे २०२० मध्ये लॉकडाऊन शिथील केलेला असताना अरुण गवळीच्या (Arun Gawli) मुलीचे लग्न होते. तेव्हा देखील गवळीला पॅरोल देण्यात आला होता. हे लग्न २९ मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारे याच्याशी योगिता गवळीचे लग्न झाले होते.

हे सुद्धा वाचा – मुंबईत गोवरची साथ, १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -