Monday, July 22, 2024
HomeदेशLadakh : लडाखमध्ये ५० हजार भारतीय जवान तैनात

Ladakh : लडाखमध्ये ५० हजार भारतीय जवान तैनात

थंडीपासून बचावासाठी थ्री लेअर पोशाख

जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) : चीनच्या कुरापतींचा धोका लक्षात घेता भारताने लडाखमध्ये (Ladakh) आपले सैन्य तैनात केले आहे. पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) डेमचोक आणि देपसांगमध्ये ५० हजार जवान तैनात करण्यात आले असून थंडीच्या कठीण परिस्थितीत शस्त्रे, रसद आणि इतर वस्तूंच्या पूर्ततेची व्यवस्था करण्यात आली आहेत.

एलएसीवर तैनात प्रत्येक सैनिकाच्या पोशाखासाठी १ लाख रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. गलवानमध्ये मे २०२० मध्ये चीनने हल्ला केला. त्यानंतर हिवाळ्यात संपूर्ण सतर्कता पाळण्यात येते. सैन्याच्या तयारीचे हे त्यानंतरचे तिसरे वर्ष. गलवाननंतर भारत-चीनमध्ये चर्चेच्या १६ फेऱ्या झाल्या. तरीही चीन आपले सैन्य गलवानमधून मागे घेण्यास तयार नाही.

जवानांसाठी थ्री लेअर पोशाख, खास तंबू उभारण्यात आला आहे. पूर्व लडाखमध्ये तैनात भारतीय जवानांसाठी स्पेशल थ्री लेअर पोशाख देण्यात आला आहे. आउटपोस्टवर थंडीपासून संरक्षणासाठी खास थर्मो टेंट लावण्यात आले आहेत. खास डाएट सप्लिमेंटही देण्यात येत आहेत. पँगॉन्ग झीलपासून हॉट स्प्रिंगपर्यंत बीआरओने २० कि.मी. रस्ता बनवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -