Friday, June 20, 2025

Fox : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने काढले बाहेर

Fox : विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने काढले बाहेर

चिपळूण (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील २५ ते ३० फूट खोल पडक्या विहिरीमध्ये कोल्हा (Fox) पडल्याची घटना समोर आली.


वनविभागाच्या पथकाने या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले. याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत भुवड (रा. गिम्हवणे, सुजाणनगर) यांनी आपल्या घराच्या जवळ असलेल्या पडक्या विहिरीमध्ये कोल्हा पडल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांना भ्रमणध्वनीवरुन कळविले.


यानंतर परीक्षेत्र वन अधिकारी दापोली वै.सा. बोराटे, वनपाल सा.स सावंत, खेर्डी वनरक्षक जगताप, सुरेश खानविलकर, किरण करमरकर, ओंकार साळवी वन्यप्राणीमित्र यांनी तत्काळ वन्यप्राणी बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहचत सुमारे २५-३० फूट खोल पडक्या विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्यास काँचपोलच्या साहाय्याने सुरक्षित ताब्यात घेतले.


त्यानंतर पशवैद्यकीय अधिकारी दापोली यांचेकडुन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन तो सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून मुक्त करण्यात आले. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आली आहे.



हे सुद्धा वाचा


Explosion at Lote : लोटेतील डिवाईन कंपनीत स्फोट

Comments
Add Comment