Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीRahul Gandhi : राहुल गांधी २२ तारखेपासून गुजरात दौऱ्यावर

Rahul Gandhi : राहुल गांधी २२ तारखेपासून गुजरात दौऱ्यावर

गुजरातमधील निवडणूक प्रचारासाठी Rahul Gandhi पक्षाच्या भारत-जोडो यात्रेतून घेणार विश्रांती

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आगामी २२ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

राहुल (Rahul Gandhi) सध्या पक्षाच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo) असून यात्रेतून विश्रांती घेत ते गुजरातला निवडणूक प्रचारासाठी जाणार आहेत. गुजरातमध्ये येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

यावेळी गुजरातमध्ये तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस (Rahul Gandhi) भाजपला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर भाजप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी निवडणुकीत आम आदमी पक्षही मैदानात उतरून दोन्ही पक्षांना टक्कर देताना दिसत आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार न केल्याबद्दल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता हिमाचलमधील निवडणुका संपल्याने काँग्रेसने गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे.

पुढील काही आठवड्यांमध्ये, काँग्रेसच्या प्रमुख पक्ष नेत्यांनी मतदानाच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यात अनेक प्रचार रॅली नियोजित केल्या आहेत. या अंतर्गत, पक्षाकडून येत्या १५ दिवसांत एकूण २५ मेगा रॅलींचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये १२५ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. काँग्रेसच्या या आक्रमक रॅली निवडणुकीच्या रणनीती अंतर्गत असतील, ज्यामध्ये पक्षाचे सर्व मोठे नेते सहभागी होणार आहेत.

महत्वाचे..

“आ गुजरात, में बनाव्युं छे”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -