Friday, September 19, 2025

stock market : भारतीय शेअर बाजार बनणार जगातला तिसरा मोठा भांडवली बाजार

stock market : भारतीय शेअर बाजार बनणार जगातला तिसरा मोठा भांडवली बाजार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारत २०२७ पर्यंत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. तज्ज्ञांना दिसणारा जागतिक ट्रेंड आणि देशाने तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रात केलेल्या मोठ्या गुंतवणुकीच्या आधारे, देश २०३० पर्यंत तिसरे सर्वात मोठे स्टॉक मार्केट (stock market) बनण्याची शक्यता आहे. हा अहवाल ‘मॉर्गन स्टॅन्ले’ने मांडला आहे.

‘मॉर्गन स्टॅन्ले’ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आधीच जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. गेल्या दशकात सरासरी सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर ५.५ टक्के नोंदवला गेला आहे. आता एक अब्जहून अधिक लोकसंख्येच्या देशात तीन मेगाट्रेंड प्रस्थापित झाले आहेत. जागतिक ऑफशोरिंग, डिजिटायझेशन आणि एनर्जी ट्रान्समिशन भारताला अभूतपूर्व आर्थिक विकासाकडे नेण्यासाठी सज्ज आहेत.

‘मॉर्गन स्टॅनले’चे मुख्य इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट रिधम देसाई म्हणाले, ‘आम्हाला विश्वास आहे की, भारत २०२७ पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यास सक्षम आहे आणि या दशकाच्या अखेरीस जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. परिणामी, भारत जागतिक क्रमवारीत वरचे स्थान पटकावत आहे आणि आमच्या मते, एका पिढीतला हा उल्लेखनीय बदल ही गुंतवणूकदार आणि कंपन्यांसाठी एक उत्तम संधी आहे.

भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन आज ३.५ ट्रिलियन डॉलर्सवरून २०३१ पर्यंत ७.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढू शकते. त्याच कालावधीत त्याचा जागतिक निर्यातीतला वाटा दुप्पट होऊ शकतो, तर बीएसई ११ टक्के वार्षिक वाढ देऊ शकते आणि बाजार भांडवल १० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. ‘मॉर्गन स्टॅनले’चे मुख्य अर्थतज्ज्ञ चेतन अह्या म्हणाले की, सध्या अविकसित देश जगात जागतिक गुंतवणूकदारांच्या रडारवर आहेत. भारत जगातल्या अघाडीच्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. यामुळे २०२३ पर्यंत वार्षिक आर्थिक उत्पादनात ४०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त वाढ होऊ शकते आणि २०२८ नंतर ही वाढ ५०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त होईल.

हे सुद्धा वाचा...

Doodle : गुगलच्या ‘डूडल’ स्पर्धेत कोलकाताचा श्लोक विजेता

Comments
Add Comment