 |
अर्थार्जन वाढेल
मेष – शिक्षण, संस्था, नोकरी-व्यवसाय, यात अनुकूल काळ आहे. ज्या व्यक्तीचा खूप मोठ्या कालावधीमध्ये अपेक्षित ठिकाणी बदली झाली नसेल, तर आता होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये आपण पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळणार आहे. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील, अर्थार्जन वाढेल. साहित्यिक, कलाकार यांना प्रसिद्धीसह नवीन संधी प्राप्त होतील. नवीन कामे मिळू शकतात. नवे करार होऊ शकतात. स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू नये अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे आहे.
|
 |
सुखमय जीवन लाभेल
वृषभ – शुभ ग्रहांची मोठ्या प्रमाणावर साथ लाभेल. पैशाची आवक वाढल्यामुळे खरेदी होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. कमी वेळात जास्त पैसा मिळविण्याची इच्छा होऊ शकते. शॉर्टकटने पैसे कमवू नका. त्याचे परिणाम निश्चितच वाईट होतील. सट्टा किंवा लॉटरीमध्ये पैसे लावल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात कुठल्याही प्रकारची वादळे येऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्यांशी वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन केल्यास फायद्यात राहतील; विद्यार्थ्यांना मनोरंजन करावेसे वाटेल. मर्यादा पाळणे आवश्यक.
|
 |
इच्छा पूर्ण होतील
मिथुन – नोकरी-व्यवसायात खूप ताण निर्माण होणार आहे. जास्त काम आणि कमी पैसे, आउटपूट कमी मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात लहान-मोठे निर्णय घेताना पूर्ण विचारांती घेणे अपरिहार्य ठरणार आहे. लहान-मोठे वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल. उत्पन्नापेक्षा खर्च वाढणार असल्यामुळे बचतीच्या बजेटमध्ये गडबड होईल. व्यापार-व्यवसायात दुकानाचे किंवा शोरूमचे भाडे अचानक वाढल्यामुळे आर्थिकदृष्ट्या ताणतणाव निर्माण होणार आहे. या कालावधीमध्ये तुम्हाला स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच तुमचे ध्येय पूर्ण होईल. |
 |
स्पर्धात्मक यश मिळेल
कर्क – आपल्या नोकरी आणि व्यवसायात किंवा करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतो. वरिष्ठांचे सहकार्य मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्याचप्रमाणे बदली होऊ शकते. कामाच्या स्वरूपात बदल घडून स्थान बदलाचे योग आहेत. आपले प्रत्येक निर्णय बुद्धिचातुर्याने आणि विवेकाने घ्यावेत, तरच आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. बेरोजगार व्यक्तींना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्याची संभावना आहे. काही व्यक्तींना मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करायची असल्यास थोडा काळ वाट बघा. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल, विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे.
|
 |
व्यावसायिक व्याप्ती वाढेल
सिंह – व्यापार व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगले बदल होतील. व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील; परंतु कष्टाचे चीज होईल. स्वतःची कामे स्वतः करा. एकूण जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल तसेच व्यावसायिक व्याप्ती वाढेल. व्यावसायिक उलाढाल वाढल्यामुळे समाधानी राहाल. नफ्याचे प्रमाण वाढेल. तसेच व्यवसायामध्ये नवीन केलेले बदल व्यवसायासाठी पूरक ठरतील. भागीदारीमध्ये किंवा नोकरी, व्यवसायात जनसंपर्क वाढेल. भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल.
|
 |
परदेशगमनाची शक्यता
कन्या – आपणास निश्चितच स्थिरता मिळणार आहे. चहूकडून आपल्याला चांगल्या बातम्या समजतील. त्यामुळे मनामध्ये उत्साह व आनंद असेल. ज्या लोकांना परदेशगमनाची अपेक्षा आहे, त्यांना परदेशगमन निश्चित होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेचे रिझल्ट चांगले येतील. कोर्टकचेरीची कामे चालली असल्यास निकाल आपल्या बाजूने लागतील. शेजारी किंवा जोडीदार यांच्याकडून तक्रारी निर्माण होतील. सबुरीने निर्णय घ्या. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील. एखादे महत्त्वाचे काम होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
|
 |
यश आपलेच आहे
तूळ – आपल्या मित्रांच्या मदतीने थांबलेला पैसा पुन्हा तुम्हाला प्राप्त होईल. ज्या व्यक्ती बेरोजगार आहेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या चालून येतील. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीमधून नोकरीसाठी बोलावणं येईल. ओळखीचा उपयोग होईल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल होतील. कौटुंबिक जीवनात नाती मजबूत होतील. पण सासू-सुनेमध्ये वाद जास्त वाढू देऊ नका. विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात पुढे जातील पण इंजिनीअर क्षेत्रात जे विद्यार्थी आहेत, त्यांना जास्त कष्ट करावे लागतील.
|
 |
पूर्ण विचारांती निर्णय घ्या
वृश्चिक – नोकरीमध्ये बदल होतील. चालू नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धी होऊ शकते. त्याचबरोबर बदलीचे योग आहेत. कामाच्या स्वरूपात बदल होऊन जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी स्वरूपाच्या नोकरीत अतिरिक्त कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता आहे, मात्र आपल्या कार्यक्षेत्राच्या मर्यादेत राहून आपले कार्य पूर्ण करावे तसेच प्रलोभनांपासून अलिप्त राहा. धार्मिक क्षेत्रात किंवा अाध्यात्मामध्ये आपली आवड निर्माण होईल. घरामध्ये गढूळलेले वातावरण असेल, त्यामध्ये बहिणीची मध्यस्ती योग्य राहील.
|
 |
सुखद वार्ता मिळेल
धनु – प्रॉपर्टी डीलर, मटेरियल सप्लायर यांच्याशी संबंधित असलेले व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपल्या करिअरसाठी हा खूपच चांगला योग आहे. जे जातक नोकरीच्या शोधात होते, त्यांना उत्तम नोकरी मिळेल. ज्यांना सरकारी नोकरीत बदली हवी आहे, त्यांना बदली मिळेल. बदली इच्छित ठिकाणी होईल. नोकरी-व्यवसायासंबंधी लांबचे प्रवास होऊ शकतात. चांगली गोष्ट आहे की, या प्रवासाचे परिणाम चांगले मिळतील. नवीन संधी प्राप्त होतील. मोठ्या ठिकाणी मोठ्या जागेवर काम करावयास मिळेल.
|
 |
आर्थिक स्थिती चांगली होईल
मकर – आपल्या आर्थिक स्थितीमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे. काही अंशी आर्थिक स्थिती चिंताजनक असू शकते. पण, लवकरच आपली आर्थिक स्थिती चांगली होईल. घरामध्ये, कुटुंबामध्ये सुरुवातीपासून चाललेले वाद-विवाद कमी होतील. घरामध्ये आनंदाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण करणे जरुरी आहे. प्रेम प्रकरणासाठी हा कालावधी चांगला आहे. हा कालावधी आपणास अनुकूल आहे. आपण आपल्या प्रियजनांबरोबर सहलीला जाऊ शकता. हा कालावधी अतिशय आनंददायी व आठवणीत राहण्यासारखा असणार आहे.
|
 |
कार्यक्षेत्राचा विस्तार होईल
कुंभ – आपल्या जन्मगावी किंवा जन्म गावापासून दूर दोन्ही ठिकाणी कुठेही असाल तेथे आपणास चांगले लाभ होणार आहेत. मागे काही योजना आपण बनवल्या होत्या, त्यावेळी त्याचा फायदा झाला नाही, पण आता त्याचे नियोजन करून त्याचे आयोजन करा. त्यात नक्की फायदा होईल. या योजना कार्यान्वित होतील. आपले कार्यक्षेत्र विस्तार करण्याची चांगली संधी आहे. नवीन नोकरीची संधी मिळेल. आपल्याला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तरी हा कालावधी आपणास उत्तम आहे. |
 |
नवीन संधी मिळेल
मीन – आपण आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवताना आपल्याला पुष्कळ ऊर्जा व चैतन्य जाणवेल. प्रेमिकांना मात्र आपल्या भावनांवर संयम राखणे आवश्यक आहे, अन्यथा दोघांमध्ये गैरसमज होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे मतभेद होऊ शकतात. व्यापार व्यवसाय, नोकरी करणाऱ्यांना हा कालावधी अतिशय उत्तम आहे. कलाकारांना नवीन संधी मिळतील, लेखक आणि कविता करणाऱ्यांना उत्तम कालावधी आहे. आपले प्रत्येक कार्य सहजतेने पूर्ण होईल. पूर्वी राहिलेली पेंडिंग कामे पूर्ण करण्यासाठी, आपल्याला वरिष्ठांचा पण सहयोग मिळू शकतो.
|