
मुंबई : रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी म्हणजेच १३ नोव्हेंबर रोजी देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी ११:०५ पासून ते दुपारी ३:५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी १०:२५ ते ३:३५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार्या फास्ट गाड्या माटुंगा गे मुलुंड मार्गावरील स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत. शिवाय ठाण्याच्या पुढे फास्ट गाड्या या १५ मिनिटे उशीराने धावतील.
हार्बर रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गोरेगाव ते पनवेल आणि बेलापूर या अप मार्गावर सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ पर्यंत मेगाब्लॉक असेल. शिवाय पनवेल, बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ दरम्यान मेगाब्लॉक असेल. या वेळेत लोकल सेवा बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान काही विशेष गाड्या धावतील.