नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील विविध राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर खेरदी केली जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ६.८ टक्के अधिक तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी देशात धान्याचा कोणत्याही प्रकार तुटवडा भासणार नसल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच तांदूळ महाग होणार नसल्याचेही सरकारनं सांगितलं आहे.
सध्या केंद्र सरकार विविध राज्यात तांदळाची खरेदी सुरु आहे. या परिस्थितीत खरेदीचे नवे आकडे समोर आले आहेत. हे आकडे देशवासीयांसाठीही आनंददायी आहेत. देशात गतवर्षीपेक्षा जास्त धानाची खरेदी झाली आहे. केंद्र सरकारनेही जनतेला अन्नधान्याची चिंता करण्याची गरज नसल्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र सरकारकडे असलेला बफर स्टॉक पुरेसा असून, आता कोणताही साठा करू नका असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये तांदळाची खरेदी केली जात आहे. जिल्हा स्तरावरून सर्व डेटा गोळा करून राजधानीला पाठवला जात आहे. आकडेवारीनुसार, पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूमध्ये यावर्षी तांदळाच्या खरेदी वाढवली आहे. उत्तर प्रदेश हे अन्नधान्न्याच्या उत्पादनाचं प्रमुख केंद्र मानले जाते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी आहे.
मुंबई: मुले असो वा वयस्कर...प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले…
मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन…
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…