Friday, June 20, 2025

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघाती मृत्यू

'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा अपघाती मृत्यू

कोल्हापूर : तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडी नजीक डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला आहे.


कल्याणीने काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील हालोंडी फाटा येथे ‘प्रेमाची भाकरी’ नावाने हॉटेल सुरू केले होतं. हॉटेल बंद करुन बाहेर पडत असतांना तिला डंपरने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.


कल्याणी मराठी टिव्ही जगतातील एक उभरती अभिनेत्री होती. अनेक मालिकांमध्ये तिने अभिनय केला होता. कल्याणीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेसह अनेक मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमठवला होता.

Comments
Add Comment