Sunday, April 20, 2025
Homeकोकणरायगडमाणगांव पोलीसांची सामाजिक बांधिलकी

माणगांव पोलीसांची सामाजिक बांधिलकी

उपचारासाठी ४ मनोरुग्णांना पाठविले दवाखान्यात

माणगाव (वार्ताहर) : माणगांव पोलीस आपले कर्तव्य पार पाडत असताना अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. अशाच सामाजिक बांधिलकीतून माणगांव पोलीस ठाण्याचे पो. नि. राजेंद्र पाटील यांनी माणगांव पोलीस ठाणे हद्दीत फिरणाऱ्या ३ व वाघाव बौद्धवाडी येथील १ अशा एकूण ४ मनोरुग्णांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठविले आहे.

गेले अनेक वर्षांपासून माणगांवच्या एसटी स्टँण्ड व परिसरात मंजिरी माधव पाठक ही महिला मनोरुग्ण अवस्थेत फिरताना संपूर्ण माणगांवकरांनी पाहिली होती. परंतु माणगांव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांना ही मनोरुग्ण महिला व एक इसम अशा दोन मनोरुग्णांबाबतची खबर मिळाली असता त्यांनी या दोघांना रत्नागिरी येथील वेड्यांच्या इस्पितळात धाडण्याचा निर्णय घेतला. व ते पुर्णतः बरे होऊन परत आले असून आता त्यांच्या कुटूंबियांसोबत आहेत.

दि. १० नोव्हेंबर रोजी माणगाव पोलीस ठाणे हद्दीत फिरणार्या ३ मनोरुग्णांना माणगाव पोलीस ठाणे येथे प्राथमिक उपचार करून व वाघाव येथील एका महिलेस असे एकूण ४ जणांना मानवतावादी कोकण संस्थेच्या सहाय्याने पुढील उपचारकरिता रुग्णवाहिकेमध्ये बसवून ठाणे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. अशा प्रकारे गावातील मनोरुग्ण केवळ दूर्लक्ष व उपचाराविना मोकाट फिरत असतात यामुळे कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पोलीसांनी लक्ष देऊन बजावलेले हे कर्तव्य गौरवास्पद आहे. या कामगिरी बद्दल माणगांवचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांनी पो.उप निरीक्षक किर्तीकुमार गायकवाड, पो. शि. रामनाथ डोईफोडे, ओमले, कोंजे, कुवेसकर, प्रशांत पाटील व आपल्या पोलीस सहकारी टीमला खास धन्यवाद दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -