Wednesday, July 9, 2025

ठाणे जिल्ह्यातूनच ८ कोटींच्या बनावट नोटा जप्त

ठाणे जिल्ह्यातूनच ८ कोटींच्या बनावट नोटा जप्त

ठाणे : बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केली. मात्र, या निर्णयाच्या ६ वर्षांनंतर बनावट नोटांचा पुन्हा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातूनच तब्बल ८ कोटींच्या बनावट नोटा ठाणे शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी कासारवडवली येथून दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून २००० च्या बनावट नोटांची तब्बल ४०० बंडल जप्त केले आहेत. या बनावट नोटांची बाजारातील किंमत ८ कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी या सर्व बनावट नोटा बाजारात चलनात आणणार होते. जवळपास सर्वच नोटा २ हजारांच्या आहेत. राम शिंदे आणि राजेंद्र राऊत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही पालघरमधील राहणारे आहेत. या दोघांना अटक केली असली तरी याप्रकरणाचा मास्टर माईंड कुणीतरी वेगळा आहे आणि त्याचा पोलीस शोध घेत आहेत. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment