Wednesday, March 26, 2025
Homeमहत्वाची बातमीआणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर!

आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर!

ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प पदरात पाडून घेण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारचे मविआकडे बोट!

मुंबई : वेदांता, एअरबस टाटा असे एकापाठोपाठ पाच प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आज पुन्हा एक प्रकल्प दुसऱ्या राज्याला मिळाला आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प पदरात पाडून घेण्यात राज्य सरकार अपयशी पडले आहे. या प्रकल्पासंबंधीच्या सर्व प्रक्रिया महाविकास आघाडीच्या काळात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या वतीने ऊर्जा उपकरण निर्मिती क्लस्टर उभारण्यात येत आहे. त्यासाठी इच्छूक असलेल्या राज्यांकडून निविदा मागवण्यात आलेल्या होता. या प्रकल्पासाठी केंद्राचे ४०० कोटींचे अनुदान मिळणार होते. महाराष्ट्रासह बिहार, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि उडिसा या राज्यांनी निविदा सादर केल्या. मात्र गुणांच्या आधारावर मध्य प्रदेश राज्याला हे ऊर्जा निर्मितीचे क्लस्टर मिळाले आहे.

१३ एप्रिल २०२२ रोजी या क्लस्टरसाठी निविदा मागवण्यात आलेल्या होत्या. ८ जून २०२२ ही निविदेची अंतिम तारीख होती. महाराष्ट्राच्या एमआयडीसीने केंद्राशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. परंतु हा प्रकल्प महाराष्ट्राला मिळू शकला नाही. ही सर्व कार्यवाही महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्याने पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुण्याच्या तळेगाव येथे होणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर टाटाचा एअरबस प्रकल्प जो नागपूरमध्ये होणार होता, तोदेखील गुजरातमधल्या वडोदऱ्याला गेला. त्यासोबतच बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्क हे प्रकल्प राज्याबाहेर गेले. नुकतंच फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन यांचा विमान इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. परंतु हा प्रकल्प हैदराबादला गेला. आता ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प सुद्धा राज्यातून निसटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -