Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडापाकिस्तानचा संघ मेलबर्नला पोहचला

पाकिस्तानचा संघ मेलबर्नला पोहचला

मेलबर्न (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कसाबसा पोहचलेला पाकिस्तानचा संघ फायनलचा सामना खेळण्यासाठी मेलबर्नला पोहचला आहे. उद्या शुक्रवारपासून पाकचे खेळाडू कसून सराव करणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंचे एअरपोर्टवरील फोटो शेअर केले आहेत.

पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत टी-२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात धडक मारली. पाकिस्तानने उपांत्य फेरीचा सामना ७ विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर या विजयासह पाकिस्तानचा संघ फायनल सामना खेळण्यासाठी मेलबर्नला पोहोचला आहे. टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार आहे. त्याकरिता पाकिस्तानचा संघ मेलबर्नला पोहोचला आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानसमोर इंग्लंडचे आव्हान असेल. इंग्लंडने गुरुवारी भारतीय संघाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -