शिकागो (वृत्तसंस्था) : दीर्घकाळ एकटेपणाचा सामना करणाऱ्या व्यक्तीला असुरक्षित वाटू लागते. ही भावना इतकी खोलवर जाते की, माणसाला सुरक्षिततेची चिंता वाटू लागते. शिकागो विद्यापीठातल्या ‘सोशल न्यूरोसायंटिस्ट’ जॉन कॅसिओपो यांनी एकाकीपणाच्या परिणामांवर संशोधन केले. संशोधनात दिसून आले आहे की, एकाकीपणामुळे व्यक्तीचा लवकर मृत्यू होऊ शकतो.
ते म्हणतात की, दीर्घकाळ एकटे राहणे हे कोणत्याही प्रकारचा धोका नसतानाही, मानवी मेंदू शरीराला धोक्याचे संकेत पाठवतो. त्यामुळे शरीर तणाव वाढवणारे हार्मोन्स सोडू लागतो. यामुळे झोप येत नाही आणि रक्तदाबाचा त्रास होतो. डॉ. कॅसिओप्पो यांना त्यांच्या संशोधनात असंही आढळून आलं आहे की, दीर्घकाळ एकटं असलेल्या व्यक्तीला इतरांचा सहवास आवडत नाही. त्याला एकटेपणा आवडतो आणि त्याची भीती वाटते.
‘ब्रिटिश जर्नल ऑफ सायकॉलॉजी’मध्ये प्रकाशित २०२१ चा संशोधन अहवाल सूचित करतो की, लोक पैसे कमावण्याच्या नादात एकमेकांशी इतकी स्पर्धा करत आहेत की, सामाजिक भानही राखू शकत नाहीत.
उच्च पदावर पोहोचलेले लोक आपलं महत्व टिकवण्यासाठी इतकं काम आणि धडपड करत आहेत की, समाजविघातक बनत आहेत. संशोधनात म्हटलं आहे की, नव-उदारमतवाद लोकांमध्ये एक प्रकारचा सामाजिक एकटेपणा, स्पर्धा आणि एकाकीपणाला प्रोत्साहन देत आहे.
तत्वज्ञानी हॅना एरेन्ड्ट यांनी या अवस्थेला ‘अनरूटनेस’ म्हटलं आहे. यामध्ये माणूस समाजापासून दूर जातोच; पण स्वत:च्याच विचारसरणीपासूनही दुरावतो. असे लोक कट्टर बनतात. त्यांना सर्वशक्तिमान देवाबद्दल चांगलं वाटतं. ते कोणत्याही धर्मांध विचारसरणीने सहज प्रेरित होतात.
या वर्षी ‘पॉलिटिकल सायकॉलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात दिसून आलं आहे की, कमी सामाजिक संबंध असलेले लोक कट्टर पक्षांना मतदान करतात. कट्टर विचारसरणीचे समर्थक आणि अतिरेकी गटांमध्ये सामील होण्यामागे एकटेपणा हे एक कारण आहे.