Monday, July 15, 2024
Homeक्रीडाभारताचे विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले!

भारताचे विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले!

इंग्लडविरुद्ध उपांत्य फेरीत लाजिरवाण्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात

अॅडलेड (वृत्तसंस्था) : इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत गुरुवारी झालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. आघाडीच्या फलंदाजांनी केलेली निराशा आणि गोलंदाजांनीही केलेल्या खराब कामगिरीमुळे भारताला हा सामना एकतर्फी गमावला. गोलंदाजांसह जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स या सलामीवीरांच्या नाबाद खेळीमुळे इंग्लंडने एकही विकेट न गमावता सहज लक्ष्य गाठले. विजयामुळे इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांच्यासमोर आता पाकिस्तानचे आव्हान आहे.

भारताने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने पॉवर प्लेमध्येच भारताला पराभवाच्या खाईत ढकलले. सलामीवीर जोस बटलरने पहिल्या चेंडूपासून हल्ला चढवण्यास सुरूवात केली. त्यांनी १० च्या सरासरीने धावा करण्यास सुरूवात केली. अॅलेक्स हेल्सही आक्रमक फलंदाजी करत होता. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६३ धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेले आव्हान इंग्लंडने १६ षटकांत एकही विकेट न गमावता पार केले. जोस बटलरने ४९ चेंडूंत नाबाद ८० धावा केल्या. तर अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूंत नाबाद ८६ धावा केल्या. तत्पूर्वी भारताच्या हार्दिक पंड्याने तुफानी फलंदाजी केली. त्याने ३२ चेंडूंत ६३ धावांची खेळी केली. विराटनेही अर्धशतक झळकावले.

आघाडीच्या फलंदाजांनी केलेली निराशा आणि गोलंदाजांच्याही खराब कामगिरीमुळे गुरुवारी भारताने इंग्लंडविरुद्ध लाजिरवाणा पराभव स्विकारला. या पराभवामुळे टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले आहे. गोलंदाजांसह जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स या सलामीवीरांच्या नाबाद खेळीमुळे इंग्लंडने एकही विकेट न गमावता सहज लक्ष्य गाठले. हार्दिक पंड्या आणि विराट कोहली यांनी फलंदाजीत चांगली कामगिरी केली. पण पराभवाने दोघांचीही अर्धशतके व्यर्थ गेली. उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळल्यामुळे भारताचे विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले आहे.

भारताने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने पॉवर प्लेमध्येच भारताला पराभवाच्या खाईत ढकलले. सलामीवीर जोस बटलरने पहिल्या चेंडूपासून हल्ला चढवण्यास सुरूवात केली. त्यांनी १० च्या सरासरीने धावा करण्यास सुरूवात केली. अॅलेक्स हेल्सही आक्रमक फलंदाजी करत होता. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ६३ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. पॉवर प्लेनंतर हेल्सची आक्रमकता अधिक वाढली. त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आपले अर्धशतक आणि संघाचे शतक धावफलकावर लावले. त्यानंतर कर्णधार बटलरने देखील अर्धशतकी मजल मारली. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने झेल सोडला आणि भारताने एकमेव विकेट घेण्याची संधी दवडली. भारताने दिलेले आव्हान इंग्लंडने १६ षटकांत एकही विकेट न गमावता पार केले. जोस बटलरने ४९ चेंडूंत नाबाद ८० धावा केल्या. तर अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूंत नाबाद ८६ धावा केल्या.

तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी लोकेश राहुलला झटपट बाद करत भारतावर सुरुवातीपासूनच दबाव बनवला. विकेट लवकर गमावल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संथ फलंदाजी केली. रोहित २७ धावा करून बाद झाला. मोठ्या धावांची अपेक्षा असलेल्या सूर्यकुमार यादवलाही फार काळ मैदानात टिकता आले नाही. ११.२ षटकांत ७५ धावांवर भारताचे तीन फलंदाज माघारी परतले होते. भारताची धावसंख्या मंदावली असताना हार्दिक पंड्याने धडाकेबाज खेळी करत भारताला २० षटकांत ६ बाद १६८ धावांपर्यंत पोहचवले. त्याने ३२ चेंडूंत ६३ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. १८ आणि १९ व्या षटकात पंड्याने चौकार, षटकारांचा धडाकाच लावला. त्याच षटकांत भारताच्या धावगतीने अधिक वेग घेतला. विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी करत हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली.

पॉवर-प्लेमध्ये खराब कामगिरी

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्यच असल्याचे भारताच्या खेळीवरून दिसले. पॉवरप्लेमध्ये अधिकाधिक धावा जमवण्यावर कोणत्याही संघाचा प्रयत्न असतो आणि त्यात जो यशस्वी ठरतो त्याचेच सामन्यावर वर्चस्व असते. यात भारतीय संघ कमी पडल्याचे दिसते. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने पॉवर-प्लेच्या ६ षटकांत १ गडी गमावून केवळ ३८ धावा केल्या होत्या. १० षटकांत भारताने केवळ ६२ धावाच केल्या होत्या. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात भारताला अपयश आले. त्याचा परिणाम भारताने उपांत्य फेरीचा सामना गमावला.

ढिसाळ गोलंदाजी

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने आपल्या स्वींगने प्रभावित केले होते. पण इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या सर्वच गोलंदाजांनी ढिसाळ गोलंदाजी केली. आपल्या वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंगही मिळत होता. पण या सामन्यात स्विंग दिसला नाही. परिणामी, भारतीय गोलंदाज पूर्णतः निष्प्रभ दिसून आले. भुवनेश्वर व अर्शदीपच नव्हे तर शमीलाही बळी मिळवण्यात अपयश आले. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंनी घोर निराशा केली. त्यांचे चेंडू खेळण्यात जोस बटलर आणि हेल्स हे जराही चाचपडले नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -