फेसबूकने ११ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूक डाउन झाल्याची माहिती समोर आली आहे. फेसबूकचे डेस्कटॉप व्हर्जन भारतात काम करीत नसल्याच्या अनेक यूजर्संनी तक्रारी केल्या आहेत. यूजर्सला ब्लँक स्क्रीन पाहायला मिळत आहे.
downdetector च्या माहितीनुसार, फेसबुकमध्ये आज सकाळी ९ च्या सुमारास अनेक यूजर्सला ही अडचण आली आहे. अनेक यूजर्संनी आतापर्यंत तक्रारी केल्या आहेत. सर्वात जास्त सर्वर डाउनची तक्रार करण्यात आली आहे. तसेच मोबाइल व्हर्जन मध्ये यूजर्सला कोणतीही समस्या येत नाही.
फेसबुक शिवाय, फेसबुक एड मॅनेजर सुद्धा ठप्प झाल्याची माहिती आहे. अनेक यूजर्सने ट्विट करून म्हटले की, मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचा हा परिणाम आहे. मेटाने या आठवड्यात ११ हजार लोकांना कामावरून काढून टाकले आहे. ट्विटर मध्ये सुद्धा नोकर कपात करण्यात आल्यानंतर सर्विस डाउन झाली होती.
Facebook ads manager server down across India😐
Who did this from Facebook?#Facebooklayoff pic.twitter.com/Zo9lQ5XGRX
— Kirtan Chauhan (@KirtanChauhan) November 10, 2022