Wednesday, June 18, 2025

माजी मंत्री अनिल परब यांना दापोली पोलीस समन्स बजावणार

माजी मंत्री अनिल परब यांना दापोली पोलीस समन्स बजावणार

दापोली : ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांना दापोली पोलीस समन्स बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे. साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यासह 3 जणांना समन्स बजावले जाणार आहे.


अनधिकृत रिसॉर्ट परबांचे असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, आता न्यायालयाच्या आदेशानंतर समन्स बजावण्याच्या दापोली पोलिसांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


केंद्रीय पर्यावरण विभागाच्यावतीने रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायदंडाधिका-यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, आता पोलिसांकडून परब तसेच आणखी तिघांना समन्स बजावले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काळात साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्या अडचणी वाढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >