Sunday, July 21, 2024
Homeक्रीडापाकिस्तानसाठी फायनलचा दरवाजा अखेर उघडला!

पाकिस्तानसाठी फायनलचा दरवाजा अखेर उघडला!

न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय

सिडनी (वृत्तसंस्था) : शाहिन शाह आफ्रिदी, बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या तिकडीला योग्य वेळी सूर गवसला आणि पाकिस्तानने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा शॉक दिला. या विजयामुळे पाकिस्तानने अंतिम फेरीत अनपेक्षित प्रवेश केला आहे.

न्यूझीलंडने दिलेले १५३ धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघाने सुरुवातच दमदार केली. त्यामुळे पाकिस्तानला विजय सोपा झाला. बाबर आणि रिझवान यांनी धडाकेबाज अशी अर्धशतके ठोकली. बाबरने ५३ धावा केल्या, तर रिझवानने ५७ धावांचे योगदान दिले. मोहम्मद हारिसने ३० धावांची साथ दिली. पाकिस्तानने १९.१ षटकांत ७ विकेट्स राखून विजयी लक्ष्य गाठले. न्यूझीलंडच्या संघाला सुरुवातीला बळी मिळवण्यात अपयश आले, त्यामुळे विजय त्यांच्यापासून दूर गेला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॉनवेने बाबरचा झेल सोडला होता. हीच चूक त्यांना महागात पडली.

न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनर यांनी प्रभावी गोलंदाजी केली. बोल्टने २, तर सँटरनने एक बळी मिळवला.

सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत न्यूझीलंडनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या करून पाकिस्तानवर प्रेशर देण्याचा डाव त्यांचा होता. पण पाकिस्तानी गोलंदाजानी सुरुवातीपासून दमदार गोलंदाजी केली. खासकरून शाहीन शाह आफ्रिदीने महत्त्वाचे विकेट्स घेतले आणि धावांही रोखून ठेवल्या. ज्यामुळे न्यूझीलंडने सुरुवातीपासून विकेट गमावल्या. फिन अॅलन ४, तर कॉन्वे २१ धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्सही ६ धावांवर तंबूत परतला. ज्यानंतर मात्र केन विल्यमसन आणि मिशेलने डाव सावरला. केन विल्यमसनने ४६ धावा तडकावल्या, तर मिशेलने नाबाद ५३ धावांची संघातर्फे सर्वाधिक धावांची खेळी खेळली. नीशमने नाबाद १६ धावाचे योगदान दिले. न्यूझीलंडने २० षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात १५२ धावा उभारल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने २, तर मोहम्मद नवाजने एक विकेट घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -