Thursday, June 12, 2025

पंतप्रधान मोदींनी दिल्या अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी दिल्या अडवाणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा ९५ वा वाढदिवस मंगळवारी झाला. त्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या.


सुमारे ४० मिनिटे पंतप्रधान त्यांच्यासोबत राहिले आणि त्यांनी केक कापला. मोदींशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही अडवाणी यांच्या घरी पोहोचले. राजनाथ सिंह यांनी अडवाणींसोबतचा फोटो ट्विट केला. त्यात 'त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असे म्हटले आहे.



केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, अडवाणींनी आपल्या अथक परिश्रमाने देशभरात पक्ष संघटना मजबूत केली. सरकारचा एक भाग असताना त्यांनी देशाच्या विकासातही अमूल्य योगदान दिले. शहा यांनी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


राजनाथ सिंह म्हणाले की, अडवाणींची गणना मोठ्या व्यक्तींमध्ये केली जाते. अडवाणींनी देश, समाज आणि पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. देशातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटींमध्ये त्यांची गणना होते.


अडवाणींच्या प्रत्येक वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देतात. भाजपच्या नेत्यांसोबत पंतप्रधानांनीही केक कापला. गेल्या वाढदिवशी पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा सकाळी अडवाणींच्या घरी स्वतंत्रपणे पोहोचले होते. दोघांनी जवळपास अर्धा तास त्यांच्यासोबत घालवला होता. यावेळी पंतप्रधानांनी जुन्या काळातील दोन-तीन किस्से सांगितले. संघटनेच्या विस्तारासाठी त्यांनी आणि अडवाणीजींनी एकत्र कसे काम केले याची आठवण त्यांनी सांगितली.

Comments
Add Comment