Sunday, March 23, 2025
Homeमहत्वाची बातमीब्रिटनमध्ये कृत्रिमरीत्या तयार रक्त माणसांना चढवले

ब्रिटनमध्ये कृत्रिमरीत्या तयार रक्त माणसांना चढवले

प्रथमच क्रांतिकारी प्रयोग

लंडन (वृत्तसंस्था) : कृत्रिमरीत्या तयार केलेले रक्त माणसांना चढवल्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. ब्रिटनमध्ये हा क्रांतिकारी प्रयोग करण्यात आला.

कृत्रिमरीत्या तयार केलेले रक्त ही कल्पना कदाचित काही दिवसांपूर्वी एक स्वप्नच होते. मात्र, मानवाने आता त्या क्षेत्रातही एक पाऊल पुढे टाकले आहे. जगात प्रथमच प्रयोगशाळेत विकसित रक्त लोकांना देण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या क्लिनिकल ट्रायलअंतर्गत प्रयोगशाळेत विकसित रक्त माणसांना देण्यात आले.

केम्ब्रिज व ब्रिस्टल विद्यापीठासह इतर संस्थांचे शास्त्रज्ञ या चाचणीत सहभागी झाले. स्टेम सेल्सद्वारे या ब्लड व्हेसल्स विकसित केल्या आहेत. प्रयोगात आणल्या जाणाऱ्या दुर्मिळ रक्तगटाचे रक्त विकसित करणे हे या संशोधनाचे उद्दिष्ट आहे. सिकलसेल, अॅनिमिया आदी स्थितींमध्ये नियमितपणे रक्त चढवण्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हे आवश्यक आहे. रक्ताचे नमुने योग्यरीत्या मेळ खात नसतील तर शरीर हे रक्त स्वीकार करत नाही आणि उपचार अपयशी ठरतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -