Wednesday, July 24, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गपालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा गुरामवाड येथील परुळेकर कुटुंबाला आधार

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा गुरामवाड येथील परुळेकर कुटुंबाला आधार

मुलाच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाचे सांत्वन करत आर्थिक मदतीचा हात

मालवण : कट्टा गुरामवाड येथील सर्वेश परुळेकर ह्या तरुणाचे गेल्या आठवड्यात ओरोस येथे अपघाती निधन झाले. आई वडीलासाठी सर्वेश एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

दरम्यान, सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी माहिती दिली. या पार्श्वभूमीवर रविवारी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी परुळेकर कुटुंबाची भेट घेत त्यांना आधार दिला. तातडीने आर्थिक मदतही सुपूर्द केली. तसेच भविष्यात सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वस्त केले. भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीनेही लवकरच परुळेकर कुटुंबाला मदत देण्यात येईल असे भाई सावंत यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत, माजी सरपंच सतिश वाईरकर, माजी उपसरपंच मकरंद सावंत, उपसरपंच शैलेंद्र शंकरदास, मंदार मठकर, शेखर फोंडेकर, संतोष देऊलकर, विलास देऊलकर, दादा जांभवडेकर, राजु परुळेकर, तुषार परुळेकर, ऋषिकेश सावंत, प्रसाद कामतेकर, मयूर भोसले, मंदार पडवळ, तेजस म्हाडगुत, सुशील गावडे, विराज गोठणकर, ओंकार खटावकर, हृषिकेश जांभवडेकर, संकेत परुळेकर, सुमित सावंत तसेच इतर पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -