Tuesday, November 11, 2025

फिफा वर्ल्ड कपकरिता ब्राझीलचा संघ जाहीर

फिफा वर्ल्ड कपकरिता ब्राझीलचा संघ जाहीर

दोहा (वृत्तसंस्था) : कतारमध्ये २० नोव्हेंबरपासून फिफा वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेकरिता प्रत्येक देश आपापला संघ जाहीर करताना दिसत आहे. दरम्यान सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलनेही आपला संघ घोषित केला आहे. सोमवारी ब्राझीलने आपल्या २६ सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये ३९ वर्षीय डेनियल एल्व्सला संधी दिली आहे. तर फर्मिनो, कोटिन्होसारखे स्टार खेळाडू नसल्याचेही दिसून आले आहे.

अॅस्टन व्हिलाचा स्टार स्ट्रायकर फिलिप कोटिन्हो दुखापतीमुळे संघात नसून दुसरीकडे, विंची, गॅब्रिएल, पेड्रो या युवा वेगवान फॉरवर्ड खेळाडूंना स्थान दिल्याने लिव्हरपूलचा स्टार फॉरवर्ड फर्मिनोला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. दरम्यान ब्राझील २४ नोव्हेंबर रोजी विश्वचषकातील पहिला सामना सर्बियाविरुद्ध खेळेल त्यानंतर स्वित्झर्लंड आणि कॅमेरुनबरोबरही त्यांचे सामने असतील.

ब्राझीलचा संघ : गोलकिपर: एलिसन (लिव्हरपूल), एडरसन (मँचेस्टर सिटी), वेव्हर्टन (पाल्मेरियास); डिफेन्डर : ब्रेमर (जुव्हेंटस), अॅलेक्स सँड्रो (जुव्हेंटस), एडर मिलिटो (रिअल माद्रिद), मार्किनोस (पीएसजी), थियागो सिल्वा (चेल्सी), डॅनिलो (जुव्हेंटस), डॅनियल अल्वेस (पुमास), अॅलेक्स टेलेस (सेव्हिला); मिडफिल्डर: ब्रुनो गुइमेरेझ (न्यूकॅसल युनायटेड), कासेमिरो (मँचेस्टर युनायटेड), फ्रेड (मँचेस्टर युनायटेड), एव्हर्टन रिबेरो (फ्लेमेंगो), फॅबिन्हो (लिव्हरपूल), लुकास पॅक्वेटा (वेस्टहॅम); फॉरवर्ड्स: अँटोनी (मँचेस्टर युनायटेड), गॅब्रिएल जीसस (आर्सनल), गॅब्रिएल मार्टिनेली (आर्सनल), नेमार ज्यू. (पीएसजी), पेड्रो (फ्लेमेन्गो), राफिन्हा (बार्सिलोना), रिकारलिसन (टोटेनहॅम), रॉड्रिगो (रिआल माद्रिद), विंची ज्युनियर (रिआल माद्रिद).

Comments
Add Comment