Friday, October 31, 2025
Happy Diwali

सीमेवरच्या सर्वात उंच भागात डिजिटल पेमेंटची व्यवस्था

सीमेवरच्या सर्वात उंच भागात डिजिटल पेमेंटची व्यवस्था

डेहराडून (वृत्तसंस्था) : काही काळापूर्वी देशातले चहाचे शेवटचे दुकान ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाले होते. त्यानंतर आजूबाजूची अनेक दुकाने याच नावाने व्हायरल झाली; मात्र सीमाभागातली अशी ‘शेवटची’ दुकाने ‘सोशल मीडिया’वर चर्चेचा विषय ठरल्याचे अनेक वेळा दिसून आले. असंच एक खास चित्र अलिकडे समोर आले.

देशातल्या सर्वात उंचीवरच्या बद्रीनाथमध्ये मणिफद्रपुरी माना नावाच्या गावाजवळ हे दुकान आहे. दुकानात दिसणारी सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याच्या काउंटरवर ‘यूपीआय बारकोड’ ठेवलेला असतो. म्हणजेच दहा हजार फूट उंचीवरूनही तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता. ‘डिजिटल इंडिया’चे हे उत्तम उदाहरण आहे.

एका यूजरने दहा हजार फूट उंचीवरील या दुकानाचे फोटो शेअर केले आहेत. चित्रात ‘सीमेवरील भारताचे शेवटचे चहाचे दुकान’ असे बोर्डवर लिहिले आहे आणि ‘यूपीआय बारकोड’ आणि दुकान मालक दिसत आहेत. छायाचित्रांमध्ये चहाच्या दुकानाच्या फलकावर ‘मनिफद्रपुरी मना, ब्यास गुफा श्री बद्रीनाथ’ असे लिहिले आहे. यानंतर हा फोटो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला.

आपल्या ट्वीटमध्ये या दुकानाची छायाचित्रे शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, एक चित्र हजार शब्दांच्या बरोबरीचे असते. हे चित्र भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टीमची व्याप्ती आणि प्रमाण दर्शवते. महिंद्रा यांचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर ट्विटर यूजर्स सतत प्रतिक्रिया देत आहेत.

Comments
Add Comment