Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीविराटला ‘प्लेअर ऑफ द मंथ’चा पुरस्कार

विराटला ‘प्लेअर ऑफ द मंथ’चा पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालत आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे आयसीसीने त्याला पुरस्काराचे गिफ्ट दिले आहे. कोहलीने प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार पटकावला आहे. आयसीसीने सोमवारी ऑक्टोबरसाठी पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली.

कोहलीसोबतच झिम्बाब्वे संघाचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही पुरुष गटात या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. पण हा पुरस्कार कोहलीच्या खात्यात आला आहे. कोहलीला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे.

३४ वर्षीय विराट कोहली जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देत होता. मात्र, त्याने तीन महिन्यांतच आपली लय साधली आहे. सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात कोहलीने आतापर्यंत सर्वाधिक २४६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३ अर्धशतके झळकावली आहेत. कोहलीने या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावा, नेदरलँड्सविरुद्ध नाबाद ६२ धावा आणि बांगलादेशविरुद्ध नाबाद ६४ धावा अशी तीन अर्धशतके झळकावली आहेत.

महिलांमध्ये पाकच्या निदा दारला पुरस्कार

महिलांमध्ये प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार पाकिस्तानच्या निदा दारला मिळाला आहे. विशेष म्हणजे तीन नॉमिनेट खेळाडूंमध्ये दोन भारतीय महिला खेळाडू होत्या. पण त्यात निदाने बाजी मारली. भारतीय महिलांमध्ये युवा फलंदाज जेमिमा रॉड्रीग्स आणि स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा यांना नॉमिनेट करण्यात आले होते. महिला आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या निदा दारचा खेळ अप्रतिम होता. तिने ६ सामन्यांत १४५ धावा ठोकत ८ विकेट्स घेतल्या. तिच्या या स्टार अष्टपैलू खेळीच्या जोरावरच नॉमिनेट करण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -