पर्थ (वृत्तसंस्था) : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर-१२ च्या शेवटच्या लढतीत भारताने झिम्बाब्वेवर सोपा विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने २५ चेंडूंत ६१ धावा केल्या.
या अर्धशतकाच्या जोरावर सूर्यकुमार यादवने एक नवा विक्रम नोंदवला आहे. यादव भारतीय संघासाठी टी-२० विश्वचषक स्पर्धेत कमी चेंडूंत अर्धशतक झळकावणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत युवराज सिंग पहिल्या क्रमांकावर आहे.
युवराज सिंगने २००७ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेत अवघ्या १२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याने ही कामगिरी इंग्लंडविरुद्ध डर्बन येथे केली होती. त्याच्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी केएल राहुल आहे. त्याने २०२१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध दुबई येथे १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते.
युवराज सिंगने २००७ मध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात २० चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर आता सूर्याने २३ चेंडूंत अर्धशतक केले आहे.