Monday, June 16, 2025

पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ब्लॅकहोलचा शोध!

पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ब्लॅकहोलचा शोध!

न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) : खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या सर्वात जवळचा ब्लॅकहोल म्हणजेच कृष्णविवर शोधला आहे. हा ब्लॅकहोल सूर्यापेक्षा १० पट मोठा आहे. हा ब्लॅकहोल पृथ्वीपासून १,५६० प्रकाशवर्षे दूर आहे. आतापर्यंतच्या सर्वात जवळ मानल्या जाणाऱ्या ब्लॅकहोलपेक्षा तो पृथ्वीच्या दुप्पट जवळ आहे. हा ब्लॅकहोल पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराइतकाच दूर आहे, ज्यामुळे तो आणखी खास आहे. तर पृथ्वीचा दुसरा सर्वात जवळचा ब्लॅकहोल सुमारे ३००० प्रकाशवर्षे दूर आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेले ब्लॅकहोल शोधण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. पूर्वी सापडलेल्या ब्लॅकहोलपेक्षा हा ब्लॅकहोल तिप्पट मोठा आहे.


अमेरिकन शास्त्रज्ञांनी सांगितले की, हा ब्लॅकहोल त्याच्या जोडीच्या ताऱ्यांच्या हालचालीचे निरीक्षण करून ओळखला गेला. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. त्याच अंतरावर हा तारा ब्लॅकहोलभोवती फिरतो. हार्वर्ड-स्मिथसोनियन सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स आणि मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अॅस्ट्रॉनॉमीचे प्रमुख लेखक करीम अल-बद्री म्हणाले, 'पहिल्यांदाच आपल्या आकाशगंगेतील तारकीय-वस्तुमानाच्या कृष्णविवरा भोवतालच्या कक्षेत सूर्यासारखा तारा सापडला आहे. ब्लॅकहोलच्या जवळ असलेला हा तारा त्याच्याभोवती फिरत आहे. खगोलशास्त्रज्ञांनी ब्लॅक होलसह आणि त्याची गती पाहण्यासाठी जेमिनी नॉर्थ टेलिस्कोपचा वापर केला, युरोपियन स्पेस एजन्सीच्या गाया स्पेसक्राफ्टमधील डेटाचे विश्लेषण करून टीमने प्रथम ब्लॅक होलची उपस्थिती ओळखली. नंतर जेमिनी नॉर्थवरील मल्टी-ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ उपकरण वापरून ब्लॅक होल ओळखले गेले.


नासाच्या म्हणण्यानुसार, पृथ्वी ब्लॅकहोलमध्ये आकर्षित होणार नाही, याचाच अर्थ पृथ्वीला यापासून कोणताही धोका नाही. कारण कोणताही ब्लॅकहोल सूर्यमालेच्या इतक्या जवळ नाही. सूर्याची जागा ब्लॅकहोलने घेतली, तरी पृथ्वीला धोका नाही. वैज्ञानिकांनी सांगितले, ब्लॅक होलमध्ये सूर्यासारखेच गुरुत्वाकर्षण असेल. पृथ्वी आणि इतर ग्रह ब्लॅकहोलभोवती फिरतील. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सूर्य कधीही ब्लॅकहोलमध्ये बदलणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा