Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीप्रकृती बिघडल्याने छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

प्रकृती बिघडल्याने छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल

मुंबई : नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ आज सकाळी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आजच डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, आज छगन भुजबळ रुग्णालयात दाखल झाले आहेत.

भुजबळ गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते. आज अस्वस्थ वाटू लागल्याने आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाले असून आज संध्याकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून ते मास्क वापरत आहेत. त्यानंतरच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्या कार्यक्रमात देखील त्यांनी मास्क वापरला होता. छगन भुजबळ यांचा ७५ वा वाढदिवसानिमित्त भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्या दरम्यान अनेकांच्या संपर्कात आल्याने आठ ते दहा दिवस भुजबळ आजारी होते. त्यावेळी देखील भुजबळ काही दिवस मुंबईत उपचार घेण्यासाठी आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -