नवी दिल्ली : श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुनाथिलकाला बलात्काराच्या आरोपाखाली ५ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी सकाळी श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलाकाला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनीमध्ये अटक करण्यात आली. सिडनीच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमधील टीम हॉटेलमधून २९ वर्षीय महिलेच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीच्या संदर्भात अटक करण्यात आली.
आठवड्याच्या सुरुवातीला रोज बे येथे महिलेवर लैंगिक अत्याचाराची नोंद झाली होती जामीन नाकारण्यात आला महिला ऑनलाइन डेटिंग ऍप्लिकेशनद्वारे अनेक दिवस त्याच्याशी संवाद साधल्यानंतर पीडितेशी गुनाथिलकाची भेट झाली. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२२ च्या संध्याकाळी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. चालू असलेल्या तपासाचा भाग म्हणून, गुन्ह्याच्या दृश्याची तपासणी करण्यात आली. गुनाथिलाकाला सिडनी सिटी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर संमतीविना लैंगिक संभोगाचे चार गुन्हे दाखल करण्यात आले.
श्रीलंकन नागरिकाला आज ऑडिओ व्हिज्युअल लिंक्सद्वारे पररामट्टा बेल कोर्टात हजर केल्यानंतर जामीन नाकारण्यात आला. श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे गुनाथिलकाला प्राथमिक फेरीत टी-२० विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. त्याला लाइनअपमध्ये स्थान देण्यात आले होते, परंतु तो संघासह ऑस्ट्रेलियातच राहिला. नोव्हेंबर २०१५ मध्ये पदार्पण केल्यापासून, तो श्रीलंकेसाठी आठ कसोटी, ४७ एकदिवसीय आणि ४६ टी-२० खेळला आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर त्यांच्या अंतिम गट सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर, रविवारी श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडला.