मुंबई : अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ५८८७५ इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नोटाला ११५६९ इतकी मत मिळाली आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले होते.
या वर्षी मे महिन्यात शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे आवश्यक असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान ३ नोव्हेंबर रोजी झाले. त्यात ३१.७४ टक्के कमी मतदान झाले. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पोटनिवडणुकीतून उमेदवारी मागे घेतल्याने रमेश लटके यांच्या पत्नी रुतुजा लटके या आरामात विजयी होतील अशी अपेक्षा होती.