Sunday, May 18, 2025

महामुंबई

भांडुपमध्ये रंग कलेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

भांडुपमध्ये रंग कलेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
नवनवीन उदयोन्मुख कलाकारांनी रंग कलेच्या माध्यमातून रंगभूमीची सेवा करावी! - अशोक पाटील, माजी आमदार

मुंबई : कलाकारांची नाळ ही रंगभूमीशी कायम जोडली गेली आहे. स्वरु एंटरटेन्मेंट संस्थेने रंग कलेचा या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे नवनवीन उदयोन्मुख कलाकारांनी रंग कलेच्या माध्यमातून रंगभूमीची सेवा करावी, अशी अपेक्षा माजी आमदार अशोक पाटील यांनी शनिवारी भांडुप येथे व्यक्त केली.


रंग कलेचा या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक दै प्रहार होते. मराठी रंगभूमी दिनानिमित्त लेखक दिग्दर्शक स्वरुप शशिकांत सावंत यांनी रंग कलेचा हा कार्यक्रम ५ नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी भांडुप पश्चिमेच्या कोकण नगर मित्र मंडळ पटांगण येथे आयोजित केला होता. सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


रंग कलेचा या कार्यक्रमात मराठी कलाक्षेत्रातील नामवंत कलाकार अभिनेत्री भाग्यश्री दळवी, खारी बिस्किट या सुप्रसिद्ध चित्रपटातील बिस्किट ची भुमिका साकारणारा बालकलाकार आदर्श कदम, व कट्यार काळजात घुसली चे कलाकार सुजय बागवे, आंतरराष्ट्रीय निवेदक श्री.किरण खोत, रंगभूषाकार किशोर पिंगळे, आदेश घडवले, लेखक विश्वास धुमाळ, अशोक दुशतकर, अनीषा माजगावकर, वैष्णवी सरफरे, सुप्रिया धुरत, नगरसेविका जागृती पाटील, निकिता घाडीगावकर, राजश्री मांदविलकर, नेहा पाटकर, अश्विनी बने ज्योती तांडेल, संजय दुडे, प्रकाश माने, प्रकाश सपकाळ, संजय शिंदे, नंदकुमार घोगळे, राजन गावडे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.


या कार्यक्रमात स्वर एंटरटेनमेंट प्रस्तुत आंतरराष्ट्रीय पुरस्कृत प्राप्त "सन्मान शहिदांचा" या शॉर्ट फिल्मला मिळालेल्या आकर्षक ट्रॉफीचे देखील मान्यवरांच्या उपस्थित अनावरण करण्यात आले. नाट्यदिग्दर्शक निखिल चव्हाण माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, नवनवीन होतकरू कलाकारांना संधी उपलब्ध करून त्यांना हक्काचे व्यासपीठ देणे यासाठी लेखक व दिग्दर्शक स्वरूप शशिकांत सावंत यांनी स्वर एंटरटेनमेंट या संस्थेच्या माध्यमातून ३० कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, हि बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. प्रत्येक कलाकारांनी गायन, नृत्य, एकांकिका, विनोदी नाटक, अशा विविध कलाकृती सादर करून कलाकारांनी उपस्थित रसिकांची मने जिंकलीत. व या कलाकारांनी अभिनयाची चुणूक दाखवून मराठी रंगभूमीची खरी सेवा केलेली आहे.


स्वरुप सावंत यांनी अनेक होतकरू कलाकारांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या पुढे देखील अशा कलाकारांची जडण घडण होईल, अशी अपेक्षा अभिनेता व नाट्य दिग्दर्शक व प्रसिद्ध कोरीओग्राफर निखिल चव्हाण यांनी प्रहार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलीय.या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य व योगदान सुप्रिया सुजय धुरत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश गोडे ,निखिल चव्हाण, प्रशांत देशमुख, शुभदा गावडे, हर्षदा सावंत, रीमा मापसेकर, श्रिया चव्हाण, हास्या चव्हाण,निलेश मिस्त्री, पाटील सर यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे निवेदन सौ.शितल अजय भोवड आणि सौ ज्योतीस्नेहा वालावलकर यांनी सुरेख केले.


"तुळशी माळ श्वासांची" हे बहारदार व क्षणोक्षणी उत्कंठावर्धक नृत्य सादर करून श्रिया, निखिल चव्हाण व हास्या यांनी श्रोत्यांची मने जिंकली. तर सायली ग्रूपने मोरया नृत्य सादरीकरण केले. तर नीलमने झोबतो गारवा ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली व वन्स मोर मिळविला. प्रीशा शींग्रे चंद्रा नृत्ये,तर सचिन सावंतने मिमिक्री छान पैकी केले. श्रिया मेस्त्री कोळी नृत्य, हेतल टक्केने नाद खुळा हि लावणी तर स्वरूप सावंत आणि टीमने ट्रेलर छान केले. अधीर मन झाले हे गीत गाताना आयुष्मा च्या आईच्या डोळ्यातून अश्रूं वहात होते. कोकणातली मच्छीवाली एकपात्री प्रयोग मयुरी निकमने छान सादरीकरण केले. भेटला विठ्ठल हे निनाद सावंत यांनी आपल्या रसाळ वाणीने गायलेल्या गाण्यांने प्रेक्षकांची व्हावा मिळवली. गौरी चाळके हिने आईचा गोंधळ तर सासू सुनांची रंगरंगोटी मंगल तृप्ती, मयुरी हेतल यांनी सादर करून कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढवली.

Comments
Add Comment