अॅडलेड : टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला.
नेदरलँडच्या विजयानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील समीकरणे बदलली आहेत. इतकेच नाही तर नेदरलँडच्या टीमने पुढील विश्चचषकात आपला प्रवेश निश्चित केला आहे.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. नेदरलँडच्या विजयाने गट २ ची समीकरणे बदलली. भारताने थेट उपांत्य फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातील विजयीसंघ उपांत्य फेरीत पोहोचेल.
काही वेळातच दोघांमधील सामना सुरू होणार आहे. नेदरलँड्सने प्रथम १५८ धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांना १४५ धावांवर रोखले.दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स दोन्ही संघ फक्त एकदाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. टी-२० विश्वचषक २०१४ दरम्यान खेळलेला हा सामना दक्षिण आफ्रिकेने सहा धावांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना प्रोटीज संघाने १४५/९ धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात नेदरलँड्स १३९ धावांवर सर्वबाद झाले. त्या सामन्यात इम्रान ताहिरने ४/२१ धावा केल्या.