Thursday, October 30, 2025
Happy Diwali

अखेर! ८ पैकी दोन चित्ते कूनो नॅशनल पार्कच्या परिसरात

अखेर! ८ पैकी दोन चित्ते कूनो नॅशनल पार्कच्या परिसरात
मध्यप्रदेश : कूनो नॅशनल पार्कमध्ये शनिवारी संध्याकाळी दोन चित्त्यांना सोडण्यात आले आहे. उर्वरीत सहा चित्त्यांनाही काही दिवसांतच अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. https://twitter.com/narendramodi/status/1589093032988549120 भारतात प्रोजेक्ट चिता अंतर्गत नामीबियाच्या ८ चित्त्यांना पीएम मोदींनी त्यांच्या वाढदिवशी भारतात आणले. विशेष म्हणजे या चित्त्यांना आता ५० दिवसांच्या आत शिकार करता येणार आहे. यातील दोन नर चित्त्यांना कूनो नॅशनल पार्कच्या मोठ्या परिसरात सोडण्यात आले आहे.
Comments
Add Comment