मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्टने अखेर गोड बातमी देऊन टाकली आहे. तिने आज मुलीला जन्म दिला आहे, आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन याविषयी माहिती दिली आहे.
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न झाले आहे. आलियाने सर एच एन रिलायन्स रुग्णालयात बाळाला जन्म दिला. आलियाला आज सकाळी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.