नवाब मलिकांची संपत्ती ईडी जप्त करणार!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्यास ईडीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. यामध्ये मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिमेला तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १४७ एकर शेतजमिनीचा समावेश आहे. मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी कायदेशीर सल्लामसलत करत आहेत.


फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची दिवंगत बहिण हसीना पारकरशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई करत फेब्रुवारी महिन्यामध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली होती. अधिनिर्णय प्राधिकरणाने या जप्तीला मंजुरी दिली आहे. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबिय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संबंधित आहेत. नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ईडीला संपत्ती जप्त करण्यास परवानगी मिळाल्याने मलिक कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व