Tuesday, September 16, 2025

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून बंद

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून बंद

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल पुनर्बांधणीसाठी ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी या संदर्भात आदेश जारी केला आहे.

हा पूल अंधेरी पूर्व आणि पश्चिम दरम्यानच्या प्रमुख आणि उपनगरातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. पूल बंद झाल्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसाठी ६ पर्यायी मार्ग दिलेले आहेत.

Comments
Add Comment