Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

फॅशन स्ट्रीट परिसरात भीषण आग

फॅशन स्ट्रीट परिसरात भीषण आग

मुंबई : मुंबईच्या प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरातील दुकानांना दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत परिसरातील २० ते २५ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही दुकाने अक्षरश: जळून खाक झाली. आगीचे कारण समजू शकले नाही.


तसेच दुकाने एकमेकांना लागूनच असल्याने अन्य दुकानांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.


अतिशय वर्दळचा भाग असलेल्या या ठिकाणी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. दुपारच्या सुमारास या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अचानक आग लागल्याने धावपळ सुरु झाली.


अग्नीशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. दरम्यान, वित्त हानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

Comments
Add Comment