Friday, March 21, 2025
Homeदेशसीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ

सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत वाढ

मुंबई : देशभरासह राज्यात दिवसेंदिवस महागाईचे प्रमाण वाढले आहे. या महागाईचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्यांना बसणार आहे. महागाईच्या झळा उसळल्या असताना आता पुन्हा एकदा पीएनजी आणि सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. महानगर गॅसकडून साडे तीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या दरात वाढ केली आहे. तर, पीएनजीच्या दरात दीड रुपयांची वाढ झाली आहे. जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, ५ नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हे दर लागू होणार आहेत.

तुमच्या घरातील गॅस सिलेंडरपासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंत प्रत्येक बाबतीत दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, महानगर गॅसकडून साडे तीन रुपये प्रति किलो सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तर, घरगुती पीएनजीच्या दरात दीड रुपये प्रति एससीएमची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यांत एमजीएलने सीएनजी आणि पीएनजी दरात आतापर्यंत अनेकदा वाढ केली आहे. त्यामुळे आता महागाईची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागणार आहे. मुंबईत सीएनजीचे वाढलेले दर ८९.५० प्रति किलो तर घरगुती पीएनजी दर ५४ रुपये प्रति एससीएम असे जाहीर करण्यात आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -