Tuesday, July 16, 2024
Homeकोकणरायगडमाथेरानमधील घोड्यांसाठी अती उताराच्या जागी जांभ्या दगडांचा वापर

माथेरानमधील घोड्यांसाठी अती उताराच्या जागी जांभ्या दगडांचा वापर

माथेरान (वार्ताहर) : माथेरानमध्ये धूळ विरहित रस्त्यांना पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी सनियंत्रण समितीच्या आदेशानुसार एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉकच्या सहाय्याने रस्ते बनविण्यात येत आहेत.

परंतु अमन लॉज स्टेशन जवळील काळोखी भागातील जवळपास २०० मीटरच्या रस्त्यावर अती उतार असल्याने घोडे घसरून पडतात असे घोडेवाल्यांचे म्हणणे होते, त्यानुसार त्यांनी आपली कैफियत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे बोलून दाखवली होती.

त्यामुळे या उताराच्या दीड मीटर पर्यंत जांभा दगड वापरण्यात यावा आणि उर्वरित अडीच मीटर रस्ता रुग्णवाहिका तसेच अग्निशमन गाडी आणि आगामी काळात येणाऱ्या ई रिक्षासाठी वापर करण्यात यावा याकामी नुकतीच एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अरविंद धाबे, संबंधित अधिकारी, माथेरान नगरीच्या प्रशासक सुरेखा भणगे आणि स्वतः आमदार महेंद्र थोरवे यांच्यात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे पुढील काळात ई रिक्षाच्या मार्गातील सर्वच अडसर एकप्रकारे संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -