Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणप्रहार कार्यालयात ‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या कलाकारांचा मनमोकळा संवाद!

प्रहार कार्यालयात ‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या कलाकारांचा मनमोकळा संवाद!

पुन्हा विनोदी चित्रपटांची लाट येणार असल्याचे विजय पाटकर यांचे सुतोवात!

मुंबई (प्रतिनिधी) : विनोदाचा रब्बर स्टार अशी उपाधी लाभलेले मिश्कील हास्य सम्राट विजय पाटकर, विनोदाचा नवा सितारा पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळे तसेच ज्येष्ठ विनोदवीर विजय कदम, जयवंत वाडकर यांनी खास प्रहार कार्यालयात त्यांच्या नव्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ चित्रपटाच्या निमित्त भेट घेतली. या चित्रपटाच्या निर्मितीचा रंजक प्रवास त्यांनी यानिमित्त मान्यवरांसोबत बोलताना कथन केला. मकरंद अनासपुरे यांसोबतच या चित्रपटात २१ मुरब्बी कलावंताच्या भूमिका असून अभिनेत्री रिमा लागू यांचा हा नायिका म्हणून अखेरचा चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच्या आठवणींना यानिमित्त उजाळा देताना हे चारही हास्यसम्राट भावूक झाले होते. याप्रसंगी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनीष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर, मुख्य लेखा व्यवस्थापक ज्ञानेश सावंत यांनी चारही कलावंतांचे स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी या कलावंतांनी दैनिक प्रहारच्या कार्यालयात मनमोकळा संवाद साधला. विचारलेल्या प्रश्नांची कलाकारांनी उत्तरे दिली. अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि वैभव अर्जुन परब लिखित ‘वऱ्हाडी वाजंत्री’ रसिकांसाठी विनोदाचा महाबंपर ठरणार असून मकरंद अनासपुरे या विनोदाच्या हुकमी एक्क्यासह ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, विजय कदम, जयवंत वाडकर, रिमा लागू यांसह पॅडी कांबळी आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीला बोहल्यावर चढवण्यासाठी जगनकुमार अर्थात मकरंद अनासपुरे उतावीळ झाल्याने ही धम्माल ११ नोव्हेंबरला कमाल करणार असल्याचे या कलाकारांनी सांगितले. विजय पाटकर यांनी शूटींगवेळचे काही किस्से सांगितले. दरम्यान या वेळी विनोदी वातावरण निर्माण झाले होते. तगड्या आणि मोठ्या संख्येने कलाकारांना जुळवून घेताना आलेले अनुभव विजय पाटकर यांनी कथन केले.

लग्न ही जगात प्रत्येकासाठी विलक्षण गोष्ट असते. वधुवर व त्याच्या नातेवाईकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय असतो. आजच्या हायटेक जमान्यात पारंपरिक लग्नसोहळ्याची जागा ‘मॅरेज इव्हेंट्स’नी घेतली आणि त्यासोबत ‘शादीराम घरजोडे’ जाऊन ‘सुटाबुटातला मॅरेजगुरु’ डॉट कॉमसोबत जागोजागी कांदेपोह्यांसोबत गट्टी जमवत नवदांपत्यांचे प्री-वेंडिंग करत मेहेंदी – संगीत पार्ट्यांमध्ये तल्लीन होऊन धम्माल कम्माल करीत आहेत. काहीशी अशीच थीम घेऊन आपल्या एका सुसज्ज मॅरेजमेंट कंपनीद्वारे जगनकुमार अर्थात आपला लाडका मक्या…पंचक्रोशीतला मॅरेजगुरू झालाय…! आजमितीस या अवलियाने आपल्या भन्नाट हुशारीतून ९९ची खेळी पार केलीय आणि रेकॉर्डब्रेक कामगिरीसाठी ‘परी’ आणि ‘युवराज’ला बोहल्यावर चढविण्याच्या तयारीत असल्याचे यावेळी या कलाकारांनी सांगितले.

icare data recovery 6 crack
universal keygen generator
mindgenius pro 6 1 crack

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -