
कल्याण (वार्ताहर) : २० वर्षांखालील आशियाई कप रग्बी स्पर्धा ताशकंद, उझबेकिस्थान येथे दिनांक ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील २ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेकरिता ५ ऑक्टोबरपासून २० वर्षांखालील भारतीय रग्बी संघाचे सराव शिबीर भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरू होते.
देशभरातून ४० खेळाडूंची या सराव शिबिरामध्ये निवड करण्यात आली होती. ह्या सराव शिबिरातून भारताचा अंतिम संघ निवडण्यात आला. या अंतिम संघात ठाणे जिल्ह्यातील रग्बी खेळाडू दिवेश देवडिगा व निशांत चौहान यांची भारतीय रग्बी संघात निवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा सचिव प्रमोद पारसी व खजिनदार यदनेश्वर बागराव यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.