नाशिक (प्रतिनिधी) : भारत सरकार आता वेगवेगळ्या देशांची करन्सी छपाई नाशिकच्या नोटप्रेसकडून करत आहे. अशातच आता नेपाळच्या नोटा छापण्याचा कंत्राट नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला मिळाले आहे. यंदा नेपाळच्या एक हजार रुपयांच्या ४३० कोटी नोटा छापण्यात येणार आहेत. यापूर्वीही नेपाळने २००७ मध्ये नोटा छापल्या होत्या.
रिझर्व बँकेने नाशिक रोडच्या प्रेसला ५००० कोटी नोटा छापण्याचे ऑर्डर दिली आहे. त्यामध्ये २०, ५०, १००, २००, ५०० च्या नोटांचा समावेश आहे. काम वेगात होण्यासाठी जपानी तंत्रज्ञांनी अनेक महिने परिश्रम घेऊन मशीन लाईन उभे केले आहे. या लाईनमध्ये चार मशीन असून कटिंग छपाई पॅकिंग एकाच वेळी करतात. सिंगलच्या दोन नवीन मशीन मार्चमध्ये तर ऑफसाइट प्रिटिंगच्या चार मशीन एप्रिलमध्ये येणार आहेत. १९६२ साली नोटांसाठी नाशिकरोडला स्वतंत्र सीएनपी नोट प्रेस सुरू झाली. तत्पूर्वी १९४८ साली पाकिस्तानच्या तर १९४० साली चीनच्या नोटा छापून दिल्या. पूर्व आफ्रिका, चीन, इराण, भूतान, श्रीलंका, बांग्लादेश, इराक, नेपाळ आदी देशांसह हैदराबादच्या निझामाच्या नोटाही छापून दिल्या. यंदा पुन्हा नेपाळच्या ३५० कोटी नोटा छापण्याची ऑर्डर नेपाळने दिली आहे.
प्रेस मजूर संघाचे जगदीश गोडसे म्हणाले की युवा पिढीही प्रामुख्याने संपूर्ण व्यवहार डेबिट कार्ड यूपीआय ऑनलाईन प्रकारे करत आहेत त्यामुळे देशातील कागदी चलनाचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे आता एक्स्पोर्ट पॉलिसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशाची करन्सी प्रिंट करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत याचाच एक भाग म्हणून आता देशातील चार करेन्सी नोट प्रेस पैकी नाशिकच्या करन्सी नोट प्रेसला नेपाळच्या एक हजार रुपयांची गरज करन्सी छापण्याची कंत्राट मिळाले असल्याचे ते म्हणाले.
नाशिकरोडची इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोटप्रेस देशभरात प्रसिद्ध आहेत. नोटांच्या छपाईचा कारखाना असल्याने अनेक देशाच्या नोटांची छपाई या प्रेसद्वारे करण्यात येते. ब्रिटिशकालीन आयएसपी प्रेसमध्ये निवडणुकांचे इलेक्शन सील, ज्युडिशअल व नॉनज्युडिशअल स्टॅम्पस, पोस्टल व रेव्हेन्यू स्टॅम्पस, स्टॅम्पपेपर्स सर्व बँकांच्या धनादेशाची छपाई होते. ब्रिटिशकाळापासून भारतात पासपोर्ट फक्त या प्रेसमध्येच छापतात. आतापर्यंत २० कोटी पासपोर्टची छपाई प्रेसने केली आहे. त्याचबरोबर जगातील ७० टक्के देशांप्रमाणेच भारताचा पासपोर्ट छापण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ते आव्हान स्वीकारत चाचणी तत्त्वावर हे पासपोर्ट एका वर्षापूर्वीच तयारी करून दिले.