Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमृत्यूपत्र (…नव्हे इच्छापत्र)

मृत्यूपत्र (…नव्हे इच्छापत्र)

अनेक जणांनी मृत्यूपत्राचा स्वतंत्र नमुना द्यावा, असे सुचवल्याने मुंबई ग्राहक पंचायतीने पूर्वी काढलेल्या माहिती पत्रकात असलेल्या नमुन्यात कालानुरूप योग्य ते बदल करून एक सर्वसाधारण उपयोग होईल, असा नमुना देत आहे. माहितीपत्रकाची सॉफ्ट कॉपी हवी असेल, तर संपर्क साधल्यास उपलब्ध करून देता येईल.

मी खाली सही करणार :

नाव :, राहणार :, पूर्ण पत्ता :, व्यवसाय :, मोबाइल
क्रमांक :, वय : वर्षे

प्रास्ताविक : या भागात घराण्याचा इतिहास, आपल्या जडण-घडणीत/अडीअडचणीत मदत करणाऱ्या/ भविष्यात मार्गदर्शन होईल अशा व्यक्तींचा थोडक्यात कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा. असे न करताही मृत्यूपत्र बनवता येईल.
माझ्या पश्चात माझ्या संपत्तीचे वाटप विना तंटा-बखेडा व सुलभरीतीने व्हावे या हेतूने स्वखुशीने व संतुलित मानसिक अवस्थेत असताना माझ्या वाट्यास आलेल्या वंशपरंपरागत मालमत्तेचे/स्वकष्टार्जित मिळकतीचे मी स्वतःच्या इच्छेने खालीलप्रमाणे मृत्यूपत्र (Will) करून ठेवीत आहे.

मालमत्ता निर्मितीचे मार्ग : माझी सर्व मालमत्ता मला माझ्या वाट्यास आलेल्या वडिलोपार्जित मिळकतीतील भाग, माझ्या नोकरीच्या/व्यवसायाच्या उत्पन्नातून निर्माण झालेली आहे, पगार/मानधन/व्यवसायातील नफा/ गुंतवणुकीतून मिळणारे व्याज, लाभांश, भांडवली नफा, मिळणारे घरभाडे हे माझ्या उत्पन्नाचे साधन आहे या सर्व स्वकष्टार्जित आणि वारसाहक्काने माझ्या वाट्यास आलेल्या मालमत्तेची माझ्या मनाप्रमाणे विल्हेवाट करण्यास पूर्ण मुखत्यार आहे.

मृत्यूपत्रातील लाभधिकारी : माझ्या कुटुंबातील खालील व्यक्ती या मृत्यूपत्राचे लाभाधिकारी आहेत.पत्नी : नाव, व्यवसाय;, वय:, पत्ता, मोठा मुलगा / मुलगी: नाव, वय, व्यवसाय, पत्ता
त्याच्या जोडीदारविषयी माहिती, त्यांच्या अपत्यांची माहिती, मुलगा/ मुलगी : नाव, वय, व्यवसाय त्याच्या जोडीदाराची माहिती, त्याच्या अपत्यांची माहिती मुलगा/मुलगी याच्यासह/ शिवाय अन्य कुणा व्यक्तीस / संस्थेस किंवा स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या कौटुंबिक ज्ञासास मालमत्तेतील सर्व अथवा काही भाग द्यायचा असल्यास त्यांचा पूर्ण तपशील द्यावा, त्याचप्रमाणे असे करण्याचे पटेल असे कारण त्याची शक्यतो कोणास वाईट वाटणार नाही, अशा पद्धतीने मांडणी करून सांगावे किंवा कोणतेही कारण न देताही असे लिहू शकता.

माझी स्थावर जंगम मिळकत खालीलप्रमाणे :

स्थावर मालमत्ता
१) राहत्या जागेचा तपशील घर/ फ्लॅट
२) शेतजमीन/ फार्महाऊस संपूर्ण तपशील
३) पडीक जमीन तपशिलासह
४) अन्य घर/फ्लॅट लीजने दिले असल्यास त्याचा तपशील
५) गोडाऊन/ऑफिस/ व्यापारी गाळा याचा तपशील.
६) अन्य स्थावर मालमत्ता
जंगम मालमत्ता

१. बँक/पतपेढी खाती तपशीलवार माहिती

बँकेचे नाव, शाखा, खाते प्रकार, खातेक्रमांक
IFSC, विशिष्ट दिवशी शिल्लख असलेली रक्कम (₹)
अन्य तपशील, सहधारक, नॉमिनी, अन्य बँका पतपेढी यातील खात्याची वरील पद्धतीने माहिती.
यातील कोणती खाती कशासाठी प्रामुख्याने वापरली जातात याचीही माहिती द्यावी.

२. शेअर्स :

ब्रोकिंग फार्मचे नाव, पत्ता, ट्रेडिंग कोड, डिपॉजिटरी / डिपॉजिटरी पार्टीसीपंटचे नाव, खाते क्र.
विशिष्ट दिवशी खात्यात असलेल्या शेअर/ बॉण्ड/ इनवीट/ रिटस/ इटीएफ यांसारख्या मालमत्तेचा तपशील, बाजारमूल्य. याचप्रकारचे अन्य खाते असल्यास त्याचा तपशील

३. मुदत ठेवी :

बँक/ पतपेढी/ कंपनी येथील मुदत ठेवींचा संपूर्ण तपशील
शाखेचे नाव, खाते क्रमांक/FDR No, Amt , मुदतपूर्ती दिनांक या सर्व गुंतवणुकीत त्याच्या व्यवहार्यतेनुसार तपशिलात बदल होऊ शकतो. याचा वर्षातून एकदा आढावा घेऊन ३१ मार्च अखेरीस असलेला तपशील माझ्या वैयक्तिक डायरीत वेगळा लिहून ठेवला जाईल.

४. सोने इतर मौल्यवान वस्तू :

तपशील प्रकार, वजन, वस्तू कायम वापरात आहे की, लॉकरमध्ये यातील तपशिलात फरक पडण्याची शक्यता आहे/नाही तरीही ३१ मार्च रोजी आढावा घेऊन लिहून ठेवण्यात येईल.

५. अन्य गुंतवणूक त्याच्या तपशिलासह

* पोस्टाच्या योजना (NSC, MIS, TD, SSY इ)
* वरिष्ठ नागरिक योजना (SCSS)
* प्रधानमंत्री वयवंदना योजना (PMVVY)
* सार्वजनिक भविष्य निर्वाहनिधी योजना (PPF)
* विमा संलग्न बचत योजना (ELSS)
* खासगी गुंतवणूक, अन्य योजना
* राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS)
* उधार म्हणून दिलेले पैसे
* म्युच्युअल फंड योजना डी मॅट खाते वगळून
योजनांची नावे, फोलिओ क्र, युनिट संख्या, बाजारमूल्य
* क्रेप्टो करन्सीमधील गुंतवणूक तपशील
* कमोडिटी करन्सी यातील गुंतवणूक तपशील
* या उल्लेख नसलेल्या अन्य योजनांचा तपशील
भविष्यातील गरजा, गुंतवणूक प्राधान्य आणि कर नियोजन यानुसार आवश्यक बदल करून वर्षांतून त्यांचा आढावा घेऊन नोंद ठेवली जाईल. त्यामुळे जंगम मालमत्ता तपशिलात फरक पडेल यातील काही गोष्टी वगळण्यात येतील तर काही नव्याने केल्या जातील. या सर्व माझ्या नावावर अस्तीत्वात असलेल्या निर्माण होणाऱ्या सर्व स्थावर जंगम मालमत्ता माझ्या पश्चात माझी पत्नी (नाव) यांना मिळाव्यात. दुर्दैवाने ती नसल्यास मुलगा/मुलगी (नाव) आणि मुलगा/मुलगी (नाव) यांना सम / विषम प्रमाणात मिळाव्यात. अथवा याशिवाय अन्य व्यक्ती / संस्था (नाव) यांना संपूर्ण अथवा काही प्रमाणात मिळाव्यात. यात लाभार्थींचा उल्लेख त्यांना मिळू शकणाऱ्या लाभासह / लाभशिवाय कारणासह करावा. सदर लाभार्थीनी आपल्या मर्जीनुसार त्याचा उपभोग घ्यावा. नाव पत्ता यांना या मृत्यूपत्राचे व्यवस्थापक म्हणून नेमले असून त्यांनी आणि / अथवा मृत्यूपत्राचे लाभार्थी म्हणजेच (त्यांची नावे) यांनी अथवा त्यांच्या वारसांनी यात व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचे संपूर्ण अधिकार मी त्यांना देत आहे. मी यापूर्वी मृत्यूपत्र केलेले नाही. सदरचे मृत्यूपत्र हे अखेरचे मृत्यूपत्र समजण्यात यावे. याप्रमाणे आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपले मृत्यूपत्र बनवून यातील जाणकार आणि वकील यांचे त्यावरील मत घ्यावे. कायद्याने आवश्यक नसले तरी डॉक्टरकडून वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे. नोंदणी करावी. याची प्रत नोंदणी अधिकारी/ व्यवस्थापक/ ट्रस्टी कंपनी यांच्याकडे अथवा स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.

-उदय पिंगळे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -