पणजी (वृत्तसंस्था) : गोव्यात समुद्र किनाऱ्यांवर दारू पिण्यास गोवा सरकारने बंदी घातली आहे. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी सरकारकडून काही नियम जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. गोवा सरकारने राज्यातील पर्यटनाशी संबंधित काही नियम कठोर केले आहेत.
गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता राखण्यासाठी सरकारकडून काही नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे. त्यांच्यावर गोवा पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
गोवा सरकारच्या नव्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. किनाऱ्यांवर कचरा फेकल्यास आर्थिक दंड ठोठावला जाणार आहे. या शिवाय किनाऱ्यावर गाडी चालवणे आणि दारू पिण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यटकांना पाच हजार ते ५० हजारांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.