अक्षयला महाराजांच्या भूमिकेत पाहून प्रेक्षक का संतापले?

  155

मुंबई : सध्या सोशल मीडियावर 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Duadale Saat) या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र त्याला पाहून प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत.


या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात मावळ्यांचा पराक्रम दाखवण्यात येणार आहे. मात्र हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार शिवरायांच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र प्रेक्षकांना मांजरेकरांची ही निवड फारशी पसंत पडली नाही. त्यामुळे मांजरेकर सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत.


शिवरायांची भूमिका एका बॉलिवूड अभिनेत्याला का दिली? असा प्रश्न आता नेटकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.



नेटकरी म्हणतात...


'तुम्हाला मराठी कलाकार मिळाले नाहीत का? तेच महाराजांची भूमिका व्यवस्थित करू शकतात.'


'मराठी चित्रपटाला भीक लागली वाटतं. अक्षय कुमार आणि छत्रपती कसं जमणार? सगळे भिकेचे डोहाळे. छत्रपती हा काळजाचा विषय आहे. फक्त अभिनयाची हौस भागवायची असेल तर तो हा विषय नाही.'


'छत्रपतींच्या नावावर पैसे कमवू नका. अक्षयला महाराजांच्या भूमिकेत आम्ही बघू शकत नाही. 'पृथ्वीराज चौहान' चित्रपटाची याने काय वाट लावली ते आम्ही पाहिलं.'


'मांजरेकरांना मराठीत कुणी मिळालं नाही का? हिंदी भाषिक कलाकार आणायची काय गरज आहे? मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा घाण करायचीये का?'


Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत